हिंगोली लोकसभा;नागरिकांचा रोष;प्रचारासाठी आलेल्या पुढाऱ्यांना परत पाठविले

Hingoli Lok Sabha; Citizens rage against candidate; Leaders sent back for campaigning

 

 

 

 

उमरखेड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध नागरिकांचा रोष दिसून आला. या ठिकाणी नेतेमंडळी अर्ध्यावरती प्रचार सोडत माघारी फिरल्याची घटना घडली आहे.

 

 

 

उमरखेड लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडून शिंदेसेनेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आलेल्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची घटना घडली आहे.

 

 

 

 

हिंगोली – उमरखेड लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या यवतमाळच्या उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे,

 

 

 

 

चीतांगराव कदम आणि कार्यकर्त्यांना मरसुळ येथील गावकऱ्यांनी परतून लावलं आहे. गावकऱ्यांनी अशी भूमिका का घेतली, असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

 

 

 

राज्यात सगळीकडे निवडणूकीची राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांचा प्रचार जोरात करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बहुतेक मंतदारसंघामध्ये

 

 

 

उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली असून ते आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत.

 

 

 

 

मरसुळ येथील मराठा तरुणांवर आरक्षणासाठी बसलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचा जाब मराठा समाजाच्या नागरिकांनी गावात प्रचारासाठी आलेल्या आमदाराला विचारला

 

 

 

 

 

आणि त्यांना गावातून परतून लावले आहे. मराठा समाजाचे नागरिक संतप्त झाल्याचे बघून आमदार नामदेव ससाने यांनी गावातून काढता पाय घेतल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

 

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव हा एक विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

त्यामुळे उमरखेड महागावचे आमदार नामदेव ससाने हे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला मरसुळ गावात गेले होते. परंतु त्यांना नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे माघारी फिरावे लागले  आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *