दादा भुसे -छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा,राजकीय चर्चाना उधाण
Dada Bhuse-Chhagan Bhujbal held a half-hour discussion behind closed doors, a political discussion
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.
यावेळी छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दादा भुसे हे पालक मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या ठिकाणी आले होते.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे हे देखील उपस्थित होते.
पालकमंत्री दादा भुसे हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म येथे दाखल होताच माजी खासदार आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ
आणि समता परिषदेचे दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे हेदेखील दादा भुसे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. दादा भुसे हे पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच भुजबळ यांच्या भेटीसाठी
त्यांच्या निवासस्थानी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात भुजबळ फार्म येथील त्यांच्या कार्यालयात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यानंतर मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पालकमंत्री बदलाबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदा संदर्भात छगन भुजबळ यांचं नाव अग्रस्थानी होतं.
या चर्चेला विराम मिळताच आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील भुजबळ यांच्यासोबत झालेल्या भेटीचे कारण सांगितले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या महाशिवपुराण कथेसंदर्भात चर्चा झाली असल्याचे दादा भुसे यावेळी म्हणाले.
प्रसिद्ध महाशिवपुराण कथा वाचक पंडित मिश्रा यांच्या कथेचे नाशिकमध्ये २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कथा आयोजक समिती सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून नाशिकचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
यांना कधी संदर्भात केलेलं नियोजन आणि कथेला उपस्थित राहणे यासंदर्भात विनंती करण्यासाठी आलो असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री दादा भुसे
यांनी माध्यमांना दिली. तसेच कथेमध्ये ज्या ज्या बाबींचा समावेश असतो त्याचे नियोजन कशा पद्धतीने केले आहे. त्याची संपूर्ण माहिती भुजबळ यांना दिले असल्याचं पालकमंत्री दादा भुसे म्हणाले.