शरद पवारांनी मागितली भरसभेत माफी;म्हणाले तुमची माफी मागतो
Sharad Pawar apologized in the Bharsabha
शरद पवार हे राज्यातील राजकारणातील मोठं नाव. राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील हे विरोधकांना उशीरा कळतं. दरम्यान शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी मागितली आहे.
माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली असे शरद पवार भरसभेत म्हणाले. असं का म्हणाले शरद पवार?
अमरावतीमध्ये दर्यापूरचे विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
त्यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आहेत. बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने जाहीर सभा घेतली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित होते.
त्यामुळे नवनीत राणांना उमेदवारी दिली ती चूक झाली आता ती चूक सुधारायची आहे, असे विधान शरद पवार यांनी केले.
भ्रष्टाचार करुन भाजपात या, काहीही होणार नाही ही मोदी गॅरंटी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
शेतकरी, महिला, गरीब कोणीही समाधानी नाही. आम्हाला भारत सरकार हवं, मोदी सरकार नको, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत. सर्व उद्योग गुजरातमध्ये गेले, अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली. ही निवडणूक शेतकऱ्यांची लढाई आहे.
शेतकरी आत्महत्या करतायत त्याबद्दलही मोदींनी बोलावं. 10 वर्षात किती शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट झालं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. यातील एक मत जरी फुटले तरी कपाळकरंटे आपण होऊ. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात.
नाराज झालेल्यांनाही एकत्र घ्या., आपलं एकसुद्धा मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. ही हुकूमशाही इथल्या इथे गाडून टाकूया असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्रही संबंध नाही. तसेच शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. मुनगंटीवार हा बुद्धी नसलेला माणूस आहे. त्याच्या मानगुटीवर बसा आणि माफी मागायला लावा.