एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा ;म्हणाले लंडन ते लखनौ सर्व कागदपत्रे माझ्याकडे

Eknath Shinde's direct warning to Uddhav Thackeray: All documents from London to Lucknow are with me

 

 

 

 

 

लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही,

 

 

 

 

 

असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका खासगी दूरचित्र वाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. तर पोराटोरांवर मी बोलत नाही, असे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेनी निशाणा साधला.

 

 

 

आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय पण आजकाल खाल्यचा शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहे.

 

 

 

कमरेखालचे वार या सगळया गोष्टी लोकांना नाही आवडत. लोकांना विकास हवा. आज जे काही आरोप होतात, खरं तरं सत्ता गेल्यानंतर काही लोकं सैरभैर झालेत.

 

 

 

 

त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय. पोरटोरांच्यावर मी बोलतं नाही. त्यांचं वय किती, त्याच्या कामाचा अनुभव, पक्षासाठी किती योगदान आहे,

 

 

 

आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताच पाणी केलेले लोक आहेत. लोकांकडून पाया पडून घेणं, लोकांना आवडतं नाही.

 

 

 

 

बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. परंतु हे सरंजामदारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. यामुळेच हा इतिहास घडला आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे.

 

 

 

 

 

 

कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही

 

 

 

ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नये.

 

 

आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यानंतर आमच्याकडे खुप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय?

 

 

 

 

 

आमच्याकडे सगळं आहे. कुटे लखनौमध्ये 200 एकर जमीन चतुर्वेदींची पकडली त्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे. लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत सगळं माहिती आहे सगळे कागदपत्र आहे.

 

 

 

 

पण आम्ही मर्यादा पाळतो. वैयक्तिक आरोप करणं बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेनी नाही शिकवलं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत.

 

 

 

 

राज ठाकरे मोठ्या मनाचे, उद्धव ठाकरेंसारखे कद्रू मनाचे नाहीत, ते आल्यानं ताकद वाढली. ज्या काही तडजोडी होतील त्याला वेळ आहे.

 

 

 

त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

खोके, कंटेनर, लंडन, लखनऊ ची जमीन हे सगळं कधी बाहेर काढणार यावर एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आता त्यांच्या बॅलन्स गेला.

 

 

 

 

उठता बसता मोदी, शाह, एकनाथ शिंदेंना बोलता… तुमची पात्रता काय तुम्ही बोलता किती. मोदींवर का जेलसी. हे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक असून जनता यांचा बंदोबस्त करेल. 2024 ला याचा दारुण पराभव होणार आहे.

 

 

 

 

राऊतांच्या देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेचा दुरुपयोग जे म्हणतात. यंत्रणेचा दुरुपयोग आत ता जे म्हणतात. ते सत्तेचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग करत होते.

 

 

 

हनुमान चालीसा वाचणाऱ्या नवरा बायकोला जेलमध्ये टाकलं. कंगनाच घर तोडल, राहुल कुलकर्णीला जेलमध्ये टाकलं, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं.

 

 

 

 

 

नारायण राणेंना जेलमध्ये टाकत होते , जेवणाच्या ताटावरून उठवले अशी किती प्रकरण आहेत. सत्तेचा दुरुपयोग करायचं आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा हे काम कोणी केलं.

 

 

 

 

सत्ता वापरून महाविकास आघाडीला मजबूत करणं आणि भाजपला संपवणे, पक्ष फोडणे, त्याच्या माणसांना जेलमध्ये टाकून हे कोणी केलं?

 

 

 

भाजपच्या मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या दाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, फडणवीसांच नावं, आशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर सगळे होते.

 

 

 

 

मला कोणाचा दबाव नव्हता. मी केलं ते केवळ बाळासाहेबांचे विचार, भूमिका पक्षाची विचारधारा वाचवायला निर्णय घेतला. लोकांनी युती म्हणून निवडलं तर ते सरकार झालं पाहिजे होतं

 

 

 

 

पण यांना माहीत होतं जसे निकाल लागले तसं आपल्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत. जे बाळासाहेबांना नको होतं काँगेस दूर ठेवा

 

 

 

माझी काँग्रेस होऊ शकत नाही तर त्यांच्या विचारांना मूठमाती कोणी दिली. जनतेच्या पाठी कोणी खंजीर खुपसला.आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला.

 

 

 

 

भावना गावळी आणि इतर नाराज आमदारांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांची समजूत काढली. त्यांच्या पाठीशी मी राहणार, त्याचा सन्मान ठेवणार, त्यांना संधी मिळणार आहे.

 

 

 

 

भाजपने मला काही सांगितले नाही. काही नाही हे सगळे मनाचे बोल असं काहींचं नाही. कोणत्याही जगेबद्दल हे करा ते करा हे मला भाजपने सांगितलं नाही.

 

 

 

मशाल कोणाला नाही माहीत धनुष्यबाण सगळ्यांना माहीत आहे. आमदारांना भीती की आमचं तिकीट कापणार असं नाही माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *