सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना कडक शब्दात इशारा आता “सहनशीलतेचा अंत पाहू नका”

Supriya Sule's stern warning to Ajit Pawar "Don't see the end of tolerance"

 

 

 

 

मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेऊ नये. माझ्या रोहितच्या आई बद्दल एक वेळ बोलला गप्प बसलो,

 

 

 

दुसऱ्या वेळी गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलला तर…आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता दिला आहे.

 

 

 

 

बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांची आई प्रतिभा पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार आणि त्यांचे अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोतच. शून्यातून विश्व कोणी निर्माण केले तर ते शरद पवार यांनी केले आहे.

 

 

 

त्यामुळे मी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार आम्ही तिघेही घराणेशाहीत आहोत. मी हे पार्लमेंटमध्येदेखील बोलले आहे. अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोत, हे नाकारून कसं चालेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

 

जन्म झाल्यावर खाली हात येतात आणि खाली हात जातात. नाती तुटायला काही वेळ लागतो. मात्र नाती जपायला लागतात. माझ्या आणि रोहित आईच्या बोललात ठीक आहे.

 

 

 

माझ्या मनगटात मोठी ताकद आहे, ती म्हणजे, माझी आजी शारदाबाईच्या बागड्याची. आज आमचे विरोधक आमच्या कुटुंबाचे वाभाडे काढत आहे.

 

 

 

 

माझी लढाई नात्याशी नसून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात आहे. बारामती म्हणजे शरद आणि शरद म्हणजे बारामती आहे.

 

 

 

कोणी गैरसमज करुन घेऊ नका. विकास काही कोणी किंवा मी स्वतःच्या खिशातून करत नाही. त्यामुळे मी विकास केला नाही आम्ही मिळून विकास केला आहे.

 

 

 

.

मी विरोधातील खासदार असताना बारामती लोकसभा मतदारसंघात वाराणशी पेक्षा अधिक काम दिव्यांग बाबत झाले आहे.

 

 

 

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात त्यांच्या विचाराचे सरकार नव्हते, तेथे विकास झाला आहे ना. विकास करताना केंद्र

 

 

 

आणि राज्यात कोण म्हणतो एकच विचाराचे लागते याचे हेच उदाहरण आहे. सत्ता हे विकास बदलाचे माध्यम असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *