छगन भुजबळ म्हणाले … राष्ट्र्वादीसोबत गेलो नसतो तर मुख्यमंत्रीपद झालो असतो !
Chhagan Bhujbal said ... I would have become the chief minister if I had not gone with the nationalists
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत रविवारी प्रसिद्ध दिली. त्या मुलाखतीत २००४ मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्ष फुटला असता, असे विधान केले.
त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून आपणास तसे सांगण्यात आले होते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, १९९१ साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते.
१९९५ मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले.
तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगण्यात आले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असे भुजबळ यांनी शरद पवार यांच्या त्या मुलाखतीवर बोलताना सांगितले.
२००४ मध्ये आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची तयार होती. आम्ही तयार होतो पण पवार साहेब बोलत नव्हते, ते नाव घेत नव्हते.
त्यांना काय अडचण होती माहीत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनाचा होतो.
त्यासाठी त्यांची गटनेतेपदी निवड केली होती. परंतु आधी भाजपने नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचे म्हटले आहे.
त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आपणास हे माहीत नाही. सर्व चर्चेत उच्चस्तरीय नेते सहभागी होतात, असे भुजबळ म्हणाले.
नशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीची जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.
ती सभाही प्रचंड मोठी होती. आता सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बाबी त्यांनी उघड केल्या आहेत.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना १९९९ मध्ये केली. त्याच्या पाच वर्षानंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता, असा आरोप अजित पवार सातत्याने करत आहे.
अजित पवार यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी मुलाखतीत उत्तर दिले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता,
असा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार काय उत्तर देणार? हे आता पाहावे लागणार आहे.
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती.
परंतु शरद पवार यांनी मंत्रीपद जास्त घेऊ आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेवर अजित पवार आता टीका करत आहेत.
त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. २००४ मध्ये पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. प्रफुल्ल पटेल २००४ पासून भाजपकडे जाण्याचा आग्रह करत होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.