मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट ,मात्र यादीतच नाव नाही आता काय करणार?

If you don't vote, your salary will be cut for three days, but there is no name in the list

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. मात्र काही ठिकाणी मतदान यादीत नाव नसल्याने गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

 

 

 

कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागातील वायलेनगर मतदान केंद्रावर निम्म्याहून अधिक मतदारांना यादीत नावच सापडत नसल्याचा आरोप होत आहे.

 

 

 

 

विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने

 

 

 

हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं अशी याचना ते करत आहेत

 

 

 

 

मतदान केंद्रावर गर्दी असली तरी निम्म्याहून अधिक मतदारांना यादीत नावच सापडत नाहीये. त्यामुळे या मतदारांनी मतदान केंद्रात ठिय्या आंदोलन केले. संतापलेल्या मतदारांकडून निवडणूक आयोग मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

 

 

 

 

माझं नाव मतदार यादीत असूनही त्याच्यापुढे डिलीटेड लिहिलं आहे. मला सांगितलं की युनिव्हर्सिटीला सोल्युशन मिळेल, तिथेही काही उपाय मिळाला नाही,

 

 

 

 

 

मला सांगितलं की पुढच्या वर्षी मतदान करा, पण माझा हक्क आहे, मला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा माझा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न विनया मोहिते नामक तरुणीने विचारला

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *