शिंदे गट ,मनसे विधान परिषद निवडणूक लढवणार ,उमेदवार झाले फायनल
Shinde group, MNS will contest the legislative council elections, the candidates have been finalized
लोकसभेची रणधुमाळी संपताच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तारखा जाहीर होताच सर्वच पक्षाला
आता विधान परिषद निवडणुकीचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना विधान परिषदेच्या चारही जागा लढवणार आहे.
राज्यात कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या चारही मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चारही जागा लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीमध्ये उमेदवारांची नावं निश्चित झाले असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमाला लाग पुढे महायुती म्हणून जो काय निर्णय होईल त्या वेळेस तो तो निर्णय घेवू अशा सूचना या बैठकीत दिल्या गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या तारखांची देखील घोषणा करण्यात आली होती.
मात्र शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. यामध्ये कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक
आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदासंघातून निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोगाकडून नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे मनसेच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित पानसे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत,
त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी सेनेचं काम केलं आहे. आता त्यांना राज ठाकरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या तारखांची देखील घोषणा करण्यात आली होती.
मात्र शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला.
यामध्ये कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदासंघातून निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोगाकडून नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुधारीत निवडणूक कार्यक्रामानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात होणार आहे, शेवटची तारीख 7 जून असणार आहे.
10 जून रोजी अर्जाची छाननी होईल, बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तर 26 जूनला मतदान होणार असून, एक जुलै रोजी निकाल लागणार आहे.