लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठ काही… घडणार ?;नेत्याच्या दाव्याने खळबळ

Something big will happen after the Lok Sabha election results; excitement due to the leader's claim

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार काल संपला आहे. सातव्या टप्प्यातील प्रचाराचा समारोप करताना बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.

 

 

 

 

काँग्रेस आणि राजदनं बिहारमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवली. या आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्त्व तेजस्वी यादव यांनी प्रकृती बरी नसताना केलं.

 

 

 

 

 

तेजस्वी यादव यांनी 200 पेक्षा अधिक सभांना संबोधित केलं. प्रचाराचा समारोप करताना तेजस्वी यादव यांनी 4 जूनला लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठ घडणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

तेजस्वी यादव यांनी 28 मेच्या प्रचारसभेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठं काही तरी घडणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर नितीश कुमार प्रचाराला बाहेर पडले नाहीत.

 

 

 

राज्यपाल प्रशासन चालवत आहेत, अधिकाऱ्यांना बोलवून बैठका घेत आहेत. भाजप आणि जदयू स्वतंत्रपणे प्रचार करत आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले.

 

 

 

 

तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, जेव्हा म्हटलं की 4 जूननंतर आमचे चाचा आपला पक्ष वाचवण्यासाठी कोणतातरी मोठा निर्णय घेऊ शकतात. तेव्हापासून ते प्रचाराला बाहेर पडलेले नाहीत.

 

 

 

 

प्रशासनाचं काम राज्यपाल करत असून अधिकाऱ्यांना बोलवून समीक्षा घेतली जा आहे. जदयू दोन जागांवर तर भाजप त्यांच्या जागांवर काम करत आहे. हे जे अंतर दिसतंय त्यातून समजतं की 4 जूननंतर काही तरी मोठं घडणार असल्याचं म्हटलं.

 

 

 

जानेवारीमध्ये नितीशकुमार यांनी महागठबंधनची साथ सोडून एनडीएमध्ये गेले होते. लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती.

 

 

 

 

तर, तेजस्वी यादव चाचा चाचा म्हणत नितीश कुमारांवर आक्रमक टीकेऐवजी भाजपवर हल्लाबोल करताना दिसून आले. नितीशकुमारांनी लालू प्रसाद यांच्यावर टीका केली तरी तेजस्वी यादव यांनी चाचांना भाजपनं हायजॅक केलं असल्याचं उत्तर दिलं.

 

 

 

 

नितीशकुमार एनडीएमध्ये परतल्यानंतर परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांच्या सभांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. नितीशकुमारांनी ते दोनवेळा मार्ग भटकले होते,

 

 

 

 

असं म्हटलं होतं. आता एनडीएसोबत राहणार असल्याचं नितीशकुमारांनी म्हटलं होतं. नितीशकुमारांनी शेवटचा प्रचार 28 मार्चला केला होता.

 

 

 

नालंदा येथे नितीशकुमारांनी जदयूचे उमेदवार कौशलेंद्र कुमार यांच्यासाठी रोड शो केला होता. 1996 पासून या जागेवर नितीशकुमारांच्या पक्षाचं वर्चस्व आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *