महाराष्ट्रातील नेत्यावर मोदी-शहा देणार भाजपची मोठी जबाबदारी

Modi-Shah will give BJP a big responsibility on the leader of Maharashtra

 

 

 

 

लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

 

 

 

भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जून २०२३ला संपुष्टात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

 

 

 

आता ही वाढवलेली मुदत देखील या महिन्यात म्हणजे ६ जूनला संपणार असल्याने भाजपच्या घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच

 

 

 

नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटनेतील आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले.

 

 

 

 

भाजप अध्यक्ष पदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव आघाडीवर आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात.

 

 

 

 

यादव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही विश्वासातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास पक्षाच्या अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

 

अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचंही नाव चर्चेत आहे. अमित शाह यांच्या विश्वासातील या नेत्याकडे लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती.

 

 

 

 

भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक होणार नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

 

 

 

 

दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. त्यानुसार संसदीय मंडळाला अध्यक्षांच्या नियुक्तीचे अधिकार मिळाले आहेत.

 

 

 

 

महाराष्ट्रातही नवा चेहरा?राज्यातही पुढील सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडून भाकरी फिरवली जाणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

 

 

 

 

 

राज्यातील प्रदेश कार्यकारिणीतही मोठे बदल होणार असल्याची शक्यता आहे. प्रदेश अध्यक्ष पदासाठी नवा OBC चेहरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे नाव अव्वल असल्याचं समजत आहे.

 

 

 

 

मराठवाड्यातील कराड यांनी  संभाजीनगरचे दोनवेळा महापौरपद भुषवलं आहे, त्यानंतर मार्च २०२०मध्ये त्यांची वर्णी राज्यसभेवर करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले असून आता नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *