बीडमध्ये नवव्या फेरीनंतर पंकजा मुंडे 10244 मतांनी आघाडीवर
After the ninth round in Beed, Pankaja Munde is leading by 10244 votes
पंकजा मुंडे 10244 मतांनी आघाडीवर आहेत. नवव्या फेरीनंतर बजरंग सोनवणे पिछाडीवर गेले आहेत. दरम्यान, हा सुरुवातीचा कल आहे.
बीडमध्ये आणखी बऱ्याच फेऱ्यांवरील मतमोजणी बाकी आहे. राज्यातील अनेक जागांवरिल कल समोर येत आहेत. बीडमधील हायहोल्टेज लढतीत सर्वांचे लक्ष आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.
तिसरी फेरी आखेर
पंकजा मुंडे 71824
बजरंग सोनवणे – 74021
बजरंग सोनवणे – आघाडी 219
बीड लोकसभा निवडणूक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक 1
पंकजा मुंडे – 20396
बजरंग सोनवणे- 21755
आघाडी -1359 (बजरंग सोनवणे )
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती.
बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती.