लोकसभेत दाणादाण उडाल्यानंतर आता महायुतीत धुसफूस

After the rift in the Lok Sabha, now the Grand Alliance is in turmoil

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. मिशन ४५ हाती घेतलेल्या महायुतीला निम्म्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत.

 

 

 

 

मागील निवडणुकीत २५ जागा लढवून २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा केवळ ९ जागा जिंकता आल्या आहेत. महायुतीला राज्यात केवळ १७ जागा मिळाल्या.

 

 

 

तर महाविकास आघाडीनं तब्बल ३० जागांवर यश मिळवलं. या निकालानंतर आता महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच जागावाटप महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरला. भाजपनं सर्वेक्षण अहवालांचा हवाला देत अनेक जागांवर शिवसेनेचे उमेदवार डेंजर झोनमध्ये असल्याचं सांगण्यात आलं.

 

 

 

 

त्यामुळे शिंदेसेनेला काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले, तर काही जागांवर जाहीर केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. आता यावरुन शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

 

 

 

आमची कामगिरी सुधारण्यासाठी आम्हाला आमच्या चुका दुरुस्त करणं गरजेचं वाटतं. आमच्या जागावाटपाचा केंद्रबिंदू सर्व्हे होते. त्या सर्व्हेंमुळे जागा बदलण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला फटका बसल्याचं मी मान्य करतो,

 

 

 

 

असं शिरसाट म्हणाले. जागावाटपाला सुरुवात झाली आणि मग यानं एक सर्व्हे आला, त्यानं एक सर्व्हे आणला. हा सर्व्हे असं म्हणतो, तो सर्व्हे असा म्हणतो, अशी चर्चा झाली. या सर्व्हेमुळे आलेला अतिआत्मविश्वास आम्हाला नडला, असं शिरसाट यांनी सांगितलं.

 

 

 

शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्य केल्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. ‘निकालाच्या विश्लेषणातून पराभवाची कारणं कळतील.

 

 

 

 

निर्णय घेण्यास विलंब झाला. जागावाटपात दावे, प्रतिदावे मागण्या होतच असतात. अनेक पक्ष एकत्र असतात त्यावेळी कमी जास्त गोष्टी घडत असतात,’ असं चव्हाण म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *