शिंदेंचे माजी खासदार म्हणाले पराजयाचे व्हिलन बावनकुळेच

Shinde's former MP said Bawankule was the villain of the defeat

 

 

 

 

मी ४२ जागांची जबाबदारी घेतो, मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट दिलंत,

 

 

 

तर ४१ ची घेतो, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय नेते अमित शाह यांना म्हणाले होते, असा दावा कृपाल तुमाने यांनी केला. जागा गमावल्याचं दुःख तुमानेंनी व्यक्त केलं.

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आम्ही सर्व जण दिल्लीत आलोय. मी दोन टर्म रामटेकचं प्रतिनिधित्व केलं. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने मी दोन्ही वेळा निवडून येत होतो.

 

 

 

 

मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोणता सर्व्हे केला माहिती नाही, असं तुमाने ‘एबीपी माझा’शी दिल्लीत संवाद साधताना म्हणाले.

 

 

 

शिंदेंसोबत राहिलेले रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करत काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

 

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात या निवडणुका झाल्या. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पराभवाची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे.

 

 

 

 

अर्थात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, पण रामटेक मतदारसंघासाठी व्हिलन बावनकुळेच आहेत, अशा भावनाही कृपाल तुमाने यांनी व्यक्त केल्या.

 

 

मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे जेव्हा चर्चेसाठी बसलो होतो, तेव्हा ज्या अट्टाहासाने ते बोलत होते, की यांना उमेदवारी द्यायचीच नाही.

 

 

 

 

कारण काय ते त्यांनाच माहिती, मला माहितीच नाही, मला सांगितलंही नाही. मुख्यमंत्र्यांवर ते रोज इकडून तिकडून दबाव आणायचे. कधी

 

 

 

मुंबई, कधी दिल्ली, अमित शाहांकडून. मला पक्षाच्या सर्व्हेत ७६ टक्के जणांनी पसंती दिली होती, तर राजू पारवे यांना केवळ एक टक्का. पण कशीबसं त्यांनी माझं तिकीट कापलं, असं तुमाने यांनी सांगितलं.

 

 

 

माझ्याऐवजी काँग्रेसच्या ज्या माणसाला तिकीट दिलं, त्याला निवडून तरी आणायचं होतं. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मला मिळालेल्या माहितीनुसार,

 

 

 

त्यांनी अमित शहांना सांगितलंही होतं, की मी ४२ ची जबाबदारी घेतो, पण तुमानेंना तिकीट दिलंत तर ४१ ची घेतो, अशा शब्दात कृपाल तुमाने यांनी चीड व्यक्त केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *