20 हजारांची लाच घेताना फौजदाराला रंगेहात पकडले;मराठवाड्यातील घटना

Faujdar was caught red-handed while accepting a bribe of 20 thousand

 

 

 

 

 

शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली लाच घेतांना लाल लुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फौजदाराला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

 

 

शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती.

 

 

 

तडजोडीअंती 20,000 लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारास तहसील कार्यालयाच्या प्रागंणातून रंगेहाथ पकडले. तर, याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

 

 

 

शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

 

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने पांडुरंग दिगंबर दाडगे, (वय 43वर्षे), पद पोलीस हवालदार बं न.1545, वर्ग-3, नेमणूक पोलीस स्टेशन चाकूर

 

 

 

 

आणि दिलीप रघुत्तमराव मोरे, (वय 33 वर्ष), पद- पोलीस उपनिरीक्षक, वर्ग 2, (अराजपत्रित), नेमणूक- पोलीस स्टेशन चाकूर अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

 

 

 

 

दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *