मनोज जरांगें आणि भुजबळ यांच्यात पुन्हा खडाजंगी

Manoj Jarangen and Bhujbal are fighting again

 

 

 

 

सरकारला हे मोडायचे आहे. पण मी सरकारची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. मी ओबीसी उपोषण करणाऱ्यांना विरोधक मनात नाही. हे सर्व भुजबळ करत आहे.

 

 

 

येवल्यावाल्याला (छगन भुजबळ) राजकीय करिअर उद्ध्वस्त केल्या शिवाय राहणार नाही. तो (भुजबळ) आमच्यात काड्या लावत आहे.

 

 

 

आम्ही आंदोलन झाल्यावर बघु, आता बघू ला बघू आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला.

 

 

 

संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातून जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी उपोषणावरून छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

 

 

 

 

‘ओबीसीची चांगली मागणी आहे. त्यामुळे मराठ्यांचे डोळे उघडतील. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी ते नेते तुटून पडले. ते आमची जमीन बळकायला लागले आहे.

 

 

मराठ्यांचे नेते उघड्या डोळ्याने हे बघत आहे. आता मराठा नेत्यांना जी मस्ती आहे ती उतरेल. आमची मागणी आहे, वरचे 16 टक्के आरक्षण कसे दिले ते सांगावे.

 

 

 

सरकारने भूमिका स्पष्ट कराव्या मंडळ समितीने 14 टक्के दिले होते. मराठा नेत्यांनी आता जातीच्या मागे उभे राहावं. आपल्या लोकांनी त्रास दिला असेल बोलून तर काही होत नाही.

 

 

 

पण ते आपल्या मुलांच्या मुळावर उठले. ओबीसी नेत्यांच्या व्यासपीठावर मराठा नेते होते, आता काय करणार आहात. त्यांच्याकडून शिका ते निवडणुका झाल्या तर एकत्र आले.

 

 

 

मराठा नेत्यांनी लाजा धरा आणि एकत्र या. मी समाजाची पाठराखण करणार आहे. मराठ्यांनी विचार बदला आणि सावध राहा. हे आपल्या नोंदी सापडल्या त्या रद्द करा असे म्हणत आहे.

 

 

‘फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता पण अन्याय होऊ देणार की नाही हे माझ्या लक्षात आले आहे. हे आंदोलन उभे करत आहे.

 

 

आता लक्षात ठेवा आम्ही बघतो तुम्ही कुठपर्यंत पुरता. येवल्यावाल्याला (छगन भुजबळ) राजकीय करिअर उद्ध्वस्त केल्या शिवाय राहणार नाही.

 

 

 

तो (भुजबळ) आमच्यात काड्या लावत आहे. आम्ही आंदोलन झाल्यावर बघु, आता बघू ला बघू आहे, असा इशाराही जरांगेंनी दिला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *