पासपोर्ट अधिकारी आणि दलालांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी ३३ ठिकाणी छापे

33 places raided in connection with alleged corruption of passport officers and brokers

 

 

 

 

केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) पासपोर्ट सेवा केंद्रांचे (पीएसके) पासपोर्ट सहायक, वरिष्ठ पासपोर्ट सहायक आणि दलालांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी नाशिक, मुंबईत ३३ ठिकाणी छापे घातले.

 

 

 

 

 

या प्रकरणी सीबीआयने मालाड, लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील १४ पासपोर्ट सहायक, वरिष्ठ पासपोर्ट सहायकांविरोधात १२ गुन्हे नोंदविले आहेत.

 

 

 

 

यासह विभागीय पासपोर्ट कार्यालयांच्या (आरपीओ)अंतर्गत कार्यरत असलेल्या १८ पासपोर्ट दलालांविरोधातही गुन्हे दाखल केले आहेत.

 

 

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडील आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असूनही पासपोर्ट देण्याच्या प्रणालीत संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांच्या संगनमताने पासपोर्ट मिळवून दिल्याचा कथित आरोप करण्यात आला आहे.

 

 

सीबीआयच्या पथकाने पासपोर्ट सेवा प्रोग्राम (पीएसपी) विभागाचे दक्षता अधिकारी आणि पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांसह २६ जुलैला पीएसकेच्या मालाड, लोअर परळ येथे अचानक पाहणी केली,

 

 

 

तेव्हा या कार्यालयातील संशयित अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांच्या मोबाइलचे सीबीआय आणि दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्लेषण केले.

 

 

 

या सर्व संशयित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समाजमाध्यमांवरील सहभाग, कागदपत्रे, यूपीआय आयडीच्या सर्व घडामोडींचे विश्लेषण केले असता, त्यात काही गोष्टी उघड झाल्या.

 

 

 

संबंधित अधिकाऱ्यांच्या संशयित व्यवहारात त्रुटी असलेली, बोगस आदी कागदपत्रे असूनही दलालांकडून पासपोर्ट वितरणासाठी मागणी करून त्याचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले.

 

 

 

या सर्व प्रकरणात अधिकाऱ्यांनी दलालांकडून कथित स्वरूपात मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेतला. लाखो रुपयांचे हे व्यवहार करताना त्यांनी रक्कम आपल्या बँक खात्यात किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्ती, कुटुंब सदस्यांच्या नावाने वळवल्याचेही आढळून आले.

 

 

 

नाशिक : संशयित अधिकारी व पासपोर्ट देणाऱ्या दलालांच्या बँक खात्यांमध्ये; तसेच त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तींच्या बँक खात्यांत पैसे जमा होत असल्याचेही सीबीआयच्या कारवाईतून समोर येत आहे.

 

 

 

 

या अनुषंगाने सीबीआयने बुधवारी मुंबईसह नाशिकमधील संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *