मराठवाडयात 18 जुलै पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Above average rainfall till July 18 in Marathwada

 

 

 

 

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उघड्या पडल्या. देशाची आर्थिक राजधानीत दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते.

 

 

रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा सोमवारी निर्माण होणार आहे. सोमवारी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे.

 

 

महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे.

 

 

 

या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 07 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 08 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर,

 

 

 

जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 07 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 08 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर,

 

 

 

जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै व 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हदगाव, देगलूर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

 

 

 

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी सोडून) पेरणी करता येते.

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.

 

 

 

 

वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

 

 

सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50 % 400 मिली प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

 

 

 

 

 

वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

 

 

 

 

वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

 

 

 

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

 

 

 

 

ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.

 

 

 

हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचत असल्यास पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून घ्यावेत. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

 

 

 

 

 

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

 

 

 

 

 

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.

 

 

 

 

चारा पिके

बहूवार्षिक संकरित चारा पिकाची (डीएचएन-6, गुणवंत) लागवड 4 X 4 फुट अंतरावर करावी.

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांचया गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

 

 

 

 

तुती रेशीम उद्योग

महाराष्ट्र शासनाने तुती लागवडी करीता तुती बेणे सरळ शेतात लागवड न करता तुती रोपवाटीका तयार करून 3 महिने कालावधी झालेल्या वयाची रोपे आखणी करून 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवड करावी. या पध्दतीत 12345 झाडे प्रति हेक्टरी लागतात. रोपाने लागवड केली तर लागवडीत तूट होत नाही. अन्यथा तुट झाली तर पुन्हा तुती बेणे न लावता तुती रोपेच लावावीत. तुती बेणे पुन्हा येत नाही व तूट कायम राहते. दुसऱ्या वर्षी झाडांची संख्या प्रति हेक्टर शिफारशीप्रमाणे किंवा 90 % च्या वर राहीली तरच मनरेगा योजनेत मंजूरी मिळते.

 

 

 

 

कुक्कुट पालन

पावसामुळे कुक्कुटपालकांना पोल्ट्री बऱ्यापैकी रोगाचा सामना करावा लागत आहे. कमी तापमान आणि उच्च आर्द्रता रोगजनक आणि परजीवींच्या वाढीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनवते. पावसाळ्यात तुमच्याय पोल्ट्री शेडचा कंदील (छताच्या बाहेरील भाग) पाऊस झाकण्यासाठी शेड करण्यासाठी 4 ते 5 फूट पुढे असणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

पावसाळ्यात खाद्याचे बुरशीजन्य दूषित होणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात खाद्य कोरडया जागी साठवा. पाण्याची बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात हवेत दमटपणा वाढतो तसेच रक्ती हगवणीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो यासाठी लीटर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी. कोलिबॅसिलोसिस, मायको टॉक्सिकोसिस याविरूध्द औषधांचे प्रतिबंधात्मक डोस, विशेषत: neodox-1 ग्रॅम/2 लिटर पाण्यातून देणे.

 

 

 

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *