कृषी विद्यापीठाचा १३ जुलैपर्यंतचा हवामान अंदाज
Agriculture University weather forecast till 13th July
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 10 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 व 13 जुलै रोजी मराठवाडयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची
तर जालना, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 10 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)
राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 व 13 जुलै रोजी मराठवाडयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 ते 20 जूलै 2024 दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी.
तूर, मूग/उडीद व भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत तण नियंत्रण करावे. केळी बागेस 50 ग्रॅम नत्र प्रति झाड खतामात्रा द्यावी. केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
आंबा बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. द्राक्ष बागेत बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही
याची काळजी घ्यावी. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.
गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात तण नियंत्रण करावे.
फुलशेती
पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांचया गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात
जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.