नवीन संसदेत पाणी घुसले , छताला लागली गळती,पाहा VIDEO
Water has entered the new parliament, there is a leak in the roof, see VIDEO
दिल्लीत मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. तर नुकतेच देशाच्या शिरपेचात भर घातलेल्या नवीन संसद भवनाच्या आवारातही पाणी घुसले आहे.
संसदेच्या मकरद्वाराजवळ पाणी साचले आहे. संसदेत पाणी भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे.
दिल्लीत काल 31 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पाऊस झाला. काल रात्रभर पाऊस सुरुच होता. नवीन संसद भवनाच्या आवारातही पावसाने मोर्चा वळवला.
या भागात पाणी साचले. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राममध्ये अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचले. मेट्रो स्टेशनबाहेर पाणी वाढल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा नाल्यात पडला. या दोघांचा या घटनेत बुडून मृत्यू झाला.
तर इतर घटनात दोघे जखमी झाले आहेत. रस्ते जलमय झाल्याने अनेक भागात नागरिकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागला. तर विमान सेवा आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली.
दिल्लीत झालेल्या पावसाने संसदेच्या आवारातच पाणी घुसले असे नाही तर नवीन इमारतीचे छतही गळत असल्याचे समोर आले आहे.
तामिळनाडूतील विरुधुनगर येथील काँग्रेसचे लोकसभेचे खासदार मणिकम टॅगोर यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहेर. त्यात नवीन संसद इमारतीच्या लॉबीमध्ये गळती लागल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीतील काही भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. दिल्लीसह आसपासच्या गावांना, शहरांना हा इशारा देण्यात आला आहे.
या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद या शहरांना येत्या काही तासात पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 30-35 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री 9 वाजेपर्यंत हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सध्या संसदेत जातीय राजकारणावरुन सत्ताधारी आणि विरोधकात तुफान हल्लाबोल सुरु आहे.
त्यातच दिल्लीत पावसाने थैमान घातले. या पावसाचे पाणी नवीन संसदेच्या आवारात पण घुसल्याचे दिसत आहे. त्यावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसने नवीन संसद परिसरात पाणी शिरल्याच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाने या प्रकरणी नोटीस दिली आहे.
Paper leakage outside,
water leakage inside. The recent water leakage in the Parliament lobby used by the President highlights urgent weather resilience issues in the new building, just a year after completion.
Moving Adjournment motion on this issue in Loksabha. #Parliament pic.twitter.com/kNFJ9Ld21d— Manickam Tagore .B????????மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) August 1, 2024
#WATCH | Delhi: Waterlogging witnessed at the Makar Dwar of Parliament after incessant rainfall in the national capital. pic.twitter.com/41qZhDASUZ
— ANI (@ANI) July 31, 2024