मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Warning of heavy rain, orange alert issued

 

 

 

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात ऐला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा सविस्तर अंदाज.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 

5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन देखील पडणार आहे. जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार आहे .

जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र, आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे.

 

माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला,

 

अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,

 

मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

दिनांक 3 ऑगस्ट रोजी परभणी, नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

दिनांक 04 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व जालना जिल्हयात तर दिनांक 03 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर,

 

जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

दिनांक 3 ऑगस्ट रोजी परभणी, नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,

 

वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 02 ते 08 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व 09 ते 15 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 ते 13 ऑगस्ट 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

संदेश :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेला मुसळधार पावसाचा अंदाजानूसार पाहता फवारणीची कामे तीन दिवस पुढे ढकलावीत व पावसाची उघाड बघून फवारणी करावी, पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी तसेच.

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व स्पोडोप्टेरा अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी

 

कुठलेही एक किटकनाशक तीन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून तीन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

 

बाजरी पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.

 

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून तीन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास

 

याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून तीन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मोसंबी बागेस 400 ग्रॅम प्रति झाड नत्र खताची मात्रा द्यावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून घ्यावेत.

 

 

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची पूर्नलागवड करावी.

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुलपिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.

 

 

 

चारा पिके

चारा पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. चारापिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

 

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना पिण्यास शुध्द व स्वच्द पाणी द्यावे. पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण 25 मिली + 100 मिली एवढे असावे.

 

 

तुती रेशीम उद्योग

पावसाळ्यात 100 टक्के आर्द्रता संगोपनगृहात असते. तुती लागवडीच्या बागेत पाऊस पडत असताना फांद्या तोडून अंधार खोलीत उभ्या करून ठेवाव्यात. पाण्याचा निचरा झाल्यानंतर संगोपनगृहात रॅकवर सारख्या फांद्या टाकाव्यात. फांद्या खाद्य देण्या आगोदर संगोपनगृहातील तापमापी यंत्राद्वारे 22 ते 28 सें.ग्रे. तापमान आणि आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची खात्री करावी.

 

 

पावसाळ्यात 100 टक्के आर्द्रता राहते अशा वेळी पांढऱ्या चुन्याची मात्रा अधिक 10 ते 15 कि.ग्रॅ. /100 अंडीपूज या प्रमाणे धूरळणी साठी वापरावी. तिसऱ्या, चौथ्या व कात अवस्थेपुर्वी कात बसताना पांढरा चुना धुरळणी कटाक्षाणे करावी. कात उठवताना विजेता 4 कि.ग्रॅ./100 अंडीपूज याप्रमाणे वापरावी. 85 टक्केच्या वर संगोपनगृहातील आर्द्रता ग्रासरी व मस्करडीन रोगास निमंत्रण ठरू शकते.

 

 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *