ठाकरे गटाच्या वकिलांची एक विनंती, सरन्यायाधीश चिडले

A plea from the Thackeray group's lawyers, the Chief Justice was furious

 

 

 

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटल्याची लवकर सुनावणी व्हावी यासाठी वारंवार विनंती करणाऱ्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वकिलावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मंगळवारी प्रचंड चिडले.

 

‘एक दिवस इथे माझ्या जागेवर बसा. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, तुम्ही तुमचा जीव मुठीत घेऊन पळून जाल’, या शब्दांत सरन्यायाधीशांनी या वकिलाला सुनावले.

 

सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील राजकीय वादाशी संबंधित दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या होत्या.

 

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित करण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी दुसरी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दाखल केली आहे.

 

शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच अजित पवार आणि त्यांच्या ४० आमदारांना नोटीस बजावली होती.

 

मंगळवारी सुनावणी सुरू करताना सरन्यायाधीश म्हणाले की, शिवसेनेचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित वादाची सुनावणी करताना खंडपीठाने

 

अजित पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एन. के. कौल यांच्या, शरद पवार गटाच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी द्यावा, या युक्तिवादाची दखल घेतली.

 

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी अजित पवार आणि त्यांच्या ४० आमदारांना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आणि त्यानंतर या याचिकेवर सुनावणी केली जाईल, असे सांगितले.

 

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वकिलाने जवळची तारीख देण्याची विनंती केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून हे प्रकरण लवकर सुनावणीसाठी घेण्यात यावे.

 

दोन-तीन दिवसांत कागदपत्रे तयार करता येतील, असेही या वकिलाने सांगितले. त्यावर चिडलेले सरन्यायाधीश म्हणाले, ‘कृपया न्यायालयाला आदेश देऊ नका.

 

तुम्ही असे का करीत नाही… केवळ एक दिवस इथे येऊन बसा आणि तुम्हाला कोणती तारीख हवी आहे ते न्यायालयाच्या शिरस्तेदारांना सांगा…’

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *