अमेरिकेत मंदी आल्यावर भारतातही या क्षेत्रात उमटणार पडसाद

After recession in America, there will be repercussions in this sector in India as well

 

 

 

जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून प्रख्यात अमेरिकेत (यूएसए) मंदीची शक्यता प्रबळ होत असून यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत.

 

 

विविध आर्थिक निर्देशक आणि बाजारातील घटकांवर नजर टाकल्यास अमेरिका मंदीच्या वाटेवर अग्रेसर असल्याचे दिसत आहे.

 

अशा परिस्थितीत, अमेरिकेतील संभाव्य मंदी आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर समजून घेऊया.

यूएसमधील अनेक मोठे आर्थिक निर्देशांक कमजोरीची चिन्हे दर्शवत आहेत. बेरोजगारीचे आकडे जानेवारीच्या निम्न पातळीपासून लक्षणीयरीत्या वाढले आणि जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ४.३ टक्क्यांपर्यंत वाढला,

 

जो तीन वर्षांतील सर्वोच्च आहे. त्याचेवेळी, आयएसएम मॅन्युफॅक्चरिंग PMI नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला, जे उत्पादन क्रियाकलापांमध्ये आकुंचन दर्शवते.

 

दरम्यान, एकीकडे चिंताजनक आकडेवारीमुळे बरेच लोक धास्तावले आहेत तर दुसरीकडे काही घडामोडी संमिश्र संकेतही देत आहेत.

 

चालू तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या २.६ टक्क्यांवरून २.९ टक्केपर्यंत वाढवला असून वेतनवाढ सध्या महागाईच्या पुढे आहे आणि घरांच्या किंमतीही वाढत आहेत. ही सर्व चिन्हे अर्थव्यवस्थेच्या मजबूती दर्शवत आहेत.

 

गेल्या आठवड्याभरात मंदीच्या शक्यतांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरे बसले असून यूएस फेड रिझर्व्हकडून आता व्याजदर कपातीची अपेक्षा आणखी वाढली आहे

 

ज्यामुळे अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे. जुलैच्या श्रमिक डेटाद्वारे सुरू झालेला सहम  नियम, मुळात बेरोजगारीच्या दरातील बदलांवर आधारित मंदीची सुरुवात सूचित करतो.

 

इतिहासात मागे वळून पाहिल्यास हा नियम आर्थिक मंदीचा विश्वासार्ह अंदाज आहे. याव्यतिरिक्त, गेल्या दोन वर्षांत वाढीला पाठिंबा देणारी फेड वित्तीय तुटीचा विस्तार

 

आता उलट होत असून वाढीवर परिणाम करत आहे. मागील काही काळापासून यूएस मंदीच्या संदर्भातील Google Trends मधील आलेख देखील खूप उंचावल्याचे दिसत आहे.

 

अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या जाळयात अडकली तर त्याचा परिणाम जगभरातील देशांवर दिसून येईल आणि भारताही याला अपवाद ठरणार नाही. शेअर बाजारात अमेरिकेला भारताची ‘मदर मार्केट’ म्हटले जाते.

 

 

अमेरिकन बाजारात हिरवळ राहिली तर भारतीय बाजारात तसेच होते. मंदी येते तेव्हा सहसा ग्राहकांचा खर्च कमी होतो ज्यामुळे भारतीय निर्यातीची मागणी कमी होऊ शकते.

 

यूएस मार्केटवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणाऱ्या आयटी, फार्मास्युटिकल्स आणि टेक्सटाईल यासारख्या क्षेत्रांमध्ये ऑर्डर घसरेल तर

 

जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येईल. आर्थिक मंदीत ही साखळी तुटणे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन बाजारांवर अवलंबून भारतीय निर्यातदारांसाठी ही आव्हानात्मक परिस्थिती ठरू शकते.

 

भारतीय IT क्षेत्र अमेरिकेतील मंदीचे विशेषतः संवेदनशील टार्गेट ठरू शकते. आर्थिक दबावांना तोंड देत अमेरिकन कंपन्या आयटी खर्चात कपात करू शकतात,

 

ज्यामुळे भारतीय कंपन्यांच्या महसुलात घट होईल, परिणामी नोकऱ्या कमी होतील आणि प्रकल्पांमध्ये कपात होऊ शकते, ज्याचा या क्षेत्राच्या वाढीवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *