महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार म्हणाले …
Sharad Pawar said about the face of Chief Ministership in Mahavikas Aghadi...

महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरूच असल्याचं दिसतंय. एकीकडे चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा उद्धव ठाकरेंचा आग्रह
तर आधी निवडणुकांना सामोरं जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका असल्याने अद्याप तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी
त्यांच्या पक्षांची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आमच्याकडे मुख्यमंत्रीपदामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आम्हाला परिवर्तन हवं आहे,जनतेला पर्याय हवं आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत.
लोकांना पर्याय हवाय तो पर्याय उपलब्ध व्हावा . 3 सप्टेंबरला कागलमध्ये जातोय तिकडे सभा घेणार आहे. अनेक जण येत आहेत. कामानिमित्त अनेकजण भेटत आहेत. तीन पक्ष एकत्रित आहेत अजून डावे पक्ष यावेत अशी इच्छा आहे.
बदलापूर घटना अतिशय चिंताजनक आहे. शालेय प्रांगणात असा प्रकार होणे ही बाब चांगली नाहीय. सतर्क राहून भूमीका घेतली पाहिजे. बालिका
आणि मुलींवर अत्याचार होतोय हे चित्र राज्यात वाढत आहे. याविरोधात राग व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद असेल हा बंद शांततेत असेल.
समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. महाराष्ट्रातील जनता जनमत तयार करायला या संपात सहभागी होतील, असे शरद पवार म्हणाले.
बदलापूर प्रकरण अतिशय धक्का देणारी आहे. याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटली आहे. कडक कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे.
बदलापूर पुरते ते नव्हते तर अनेक गोष्टी होत आहे. मुली अत्याचार,बालिका अत्याचार होत आहे,या घटना वाढत आहे,लोकाच्या राग उद्रेक आहे.
संघर्ष भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,या प्रश्नांची अस्था असलेला प्रत्येक घटक यात सहभागी
व्हावा तीव्र भावना व्यक्त कराव्यात. महाराष्ट्रातील जनता मुली बाळांसाठी एकत्रित येत भावना व्यक्त करतील,असे शरद पवार म्हणाले.