लाडक्या बहिणींसाठी होणार महत्वाची मोठी घोषणा
An important big announcement for dear sisters
लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागली. अनेकांचे बँकेत खाते नव्हते.
उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक अशा अनेक गोष्टींसाठी महिलांना बराच वेळ लागला. राज्यातील अनेक महिलांचे अर्ज अजूनही प्राप्त होत आहे.
तर काहींना अर्ज भरण्यास वीज, इंटरनेट, गर्दी यामुळे वेळ लागत आहे. 31 ऑगस्टपर्यंत योजनेची मुदत आहे. पण आता सरकारने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत.
यवतमाळ येथे शनिवार लाडकी बहीण योजनेविषयीचा कार्यक्रम झाला. त्यात अजितदादा यांनी विरोधकांवर या योजनेचा अपप्रचार करत असल्याचा हल्लाबोल केला.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण विरोधकांचा समाचार घेतला. आमचे विरोधक योजना बंद कसे करता येईल ते पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेचा फायदा 10 टक्के महिलांना होणार नाही, असा विरोधक खोटा प्रचार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या योजनेच्या लाभापासून कुठल्याही बहिणीला वंचीत ठेवण्यात येणार नाही,
असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मोठे संकेत दिले. योजनेत शेवटचा अर्ज येईपर्यंत अन् सप्टेंबर महिन्यातसुद्धा लाभ देणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्याचा संकेत त्यांनी दिला.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास २ कोटी अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट अखेरीस अर्जाची अडीच कोटी इतकी संख्या होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. जवळपास १. ६० कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे.
मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळ मुदत वाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ज्या महिलांना बँक खाते उघडायला वेळ लागला.
उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही. ज्यांचा यापूर्वीचा अर्ज बाद झाला वा इतर कारणांमुळे ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना दिलासा मिळणार आहे.