नवीन योजना महिलांना मिळणार 50000 रुपये

New scheme women will get 50000 rupees

 

 

 

 

महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणखी एक नवीन योजना सुरु केली जाणार आहे.

 

मात्र, ही नवीन योजना ओडिसा सरकार सुरु करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

 

सुभद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार? अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

 

 

देशातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना सुरु करत आहे. तसेच विविध राज्यांमधील सरकारे देखील महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत.

 

 

ओडिसा सरकारनं देखील एक नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सुभद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे.

 

 

ओडिशा सरकारनं सुरु केलेल्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना 50000 रुपये दिले जाणार आहेत. ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 10000 हजार रुपये दिले जातील.

 

सरकारच्या या योजनेत महिलांना प्रत्येकी 5000 रुपयांच्या दोन हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 5 वर्षात 50 हजार रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

 

सुभद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मूळ ओडिशा राज्यातील असणेही आवश्यक आहे.

 

ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेत असेल. त्यानंतरही त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

 

 

ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुभद्रा योजना 17 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे हप्ते वर्षातून दोन वेळा देणार आहे.

 

पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *