धनगर आरक्षणाला नरहरी झिरवाळ यांचा विरोध

Narahari Jirwal's opposition to Dhangar reservation

 

 

 

विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

 

धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का?

 

असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. झिरवाळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. आदिवासी आरक्षण हवे हा हट्ट का?

 

आमच्यात आरक्षण हवे हा हट्ट योग्य नाही. कालच्या बैठकीची मला कल्पना दिली नाही, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

 

माझी सरकला विनंती आहे. जसे त्यांना बोलवले जाते तसं आम्हालाही बोलवलं पाहिजे. आमचे नेते आहेत. मंत्री आहेत त्यांना बैठकीला बोलावयला हवे होते.

 

मी विधान सभेचा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील.

 

सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे, असंही नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.

 

दरम्यान, झिरवाळ यांच्या भूमिकेला धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे दीपक बोराडे यांनी विरोध केला आहे. झिरवाळ यांचा बोलावता धनी दुसरा कोणीतरी आहे.

 

नुसते जात प्रेम आहे म्हणून धनगरांना खेटू नका. ध्यानात ठेवा धनगराशी वाकडं, तर नदीत लाकडं, असा इशाराच दीपक बोराडे यांनी दिला आहे.

 

त्यांचे वय झालेले आहे. त्यांनी वयाचे भान ठेवून बोलावे. त्यांच्या आदिवासी खात्याचे मंत्री विजय गावीत यांना आमंत्रण होते. मात्र ते गैरहजर होते. याची झिरवाळ यांनी नीट माहिती घेऊन बोलावे.

 

एका समाजाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुमच्या समाजाप्रती तुमचे प्रेम आहे, आम्ही आपला आदर करतो आणि आदरपूर्वक बोलतो. आम्ही संविधानाला मानतो.

 

तुम्हीही संविधानाला मानलं पाहिजे. देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते की, माझा अभ्यास झालेला आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. ते त्यांनी द्यावेत.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या वचनाचा आणि धनगर समाजाचा संघर्ष आहे. या संघर्षात तुम्ही नाक खुपसू नये. आज मी तुम्हाला झिरवाळ साहेब म्हणतो. मात्र उद्या मी काय बोलेल याची तुम्ही कल्पनाही करणार नाही, असा दमच बोराडे यांनी दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *