स्टेट बॅक ऑफ इंडियाने सर्व ग्राहकांचे जीवन मूलभूतपणे सोपे केले ; अमितकुमार जोंधळे.
State Back of India makes life fundamentally easier for all customers; Amit Kumar Jondhale.
प्र]देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली. बँकेने काळाशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न केला आहे
आणि इंटरनेट बँकिंग सेवा सुरू केल्यानंतर आता मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडे ग्राहकांच्या गरजेनुसार विविध बँकिंग अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत.
असे प्रतिपादन एस.बी.आय पुर्णा शाखेचे व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे यांनी आज आहेरवाडी येथील राजर्षी शाहु विद्यालयात केले.
विघालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचांराचे पगारी खाते काढुन त्यानां आज खाते पासबुक वाटप करण्यात आले यासाठी त्यानीं शाळेत भेट देऊन
शिक्षकांना व गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले पुढे बोलताना ते म्हणाले की YONO चा अर्थ यू नीड ओन्ली वन आहे. SBI ने हे ऍप्लिकेशन लाँच केले
त्यांचे सर्व उपक्रम एकाच छत्राखाली समाविष्ट आहेत आणि कोणतीही सेवा वगळली जाणार नाही. यामुळे त्यांच्या सर्व ग्राहकांचे जीवन मूलभूतपणे सोपे झाले आहे
आणि त्यांना त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी बँकेला भेट देण्याची गरज नाही हे सुनिश्चित केले आहे. बँकेने ऑफर केलेल्या जवळपास सर्व सेवा या ऍप्लिकेशनद्वारे मिळू शकतात.
विशेषतः राज्य कर्मचाऱ्यानां सॅलरी अंकाउन्ट वर पुष्कळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव यांनी जोंधळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
याप्रसंगी बॅकेचे गजानन महाजन,शाळेतील वरिष्ठ लिपीक गंगाधर सोनटक्के, बबन बगाटे, प्रा.सतिश भालेराव, प्रा.ऊत्तम मोरे,प्रा.प्रदिप कदम,
सुनिल पारवे, दत्ता गंगौञे, कानगुले, भारती, बबन पारवे, संदिप विश्वासराव, सत्यम सर मुंडे,आदि कर्मचारी उपस्थित होते