गोमूत्र पाजून गरब्यात एन्ट्री ,भाजप नेत्याचा नवा फार्मुला !
Entry into poverty by drinking cow urine, BJP leader's new formula!
गरबा कार्यक्रमांमध्ये गैर हिंदूंचा प्रवेश रोखण्यासाठी इंदूर भाजप जिल्हाध्यक्षानं वेगळाच उपाय सुचवला आहे. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजा.
तो व्यक्ती हिंदू असेल तर त्याला गोमूत्र पिण्यास कोणतीच हरकत असणार नाही. कारण आज काल आधार कार्डही एडिट करता येतं.
त्यामुळे बोगस ओळखपत्र, भगवा टिळा लावून अनेक जण गरब्यात शिरु पाहतात. हे सगळं पाहता गोमूत्र पाजूनच गरब्यासाठी प्रवेश देण्यात यावा, असं भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा म्हणाले.
पत्रकारांनी चिंटू वर्मा यांना गरब्यात येणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर लोकांनी मोठ्या संख्येनं गरबा खेळण्यास यायला हवं, असं वर्मा म्हणाले.
‘लोकांनी टिळा लावून गरब्याला यायला हवं. गरब्याला प्रवेश देण्याआधी प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजायला हवं. कारण गाय
आपली माता आहे. आपण तिची पूजा करतो. त्यामुळे गोमूत्र पिताना हिंदूना कोणतीही अडचण येणार नाही,’ असा युक्तिवाद वर्मांनी केला.
नवरात्र काळात आपण दुर्गा मातेची पूजा करतो. आपण सगळेच गोमूत्राचा वापर करतो. तर सगळ्यांना ते पाजायला हवं. त्यात कोणाला का अडचण असावी,
असा सवाल वर्मांनी विचारला. पितृपक्ष संपत आला आहे. पितृपक्ष संपताच नवरात्र पर्वाला सुरुवात होते. या कालावधीत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो.
गरबा कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. या कालावधीत बऱ्याचदा महिलांसोबत छेडछाडीच्या घटना घडत असतात. अन्य धर्मीय व्यक्ती गरब्यात
घुसखोरी करुन, महिला-तरुणींना छेडत असल्याचे आरोप होतात. गेल्या काही वर्षांमध्ये या घटना वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांनी गोमूत्रचा उपाय सुचवला आहे.