बजरंग दलाने पुण्यात दांडिया कार्यक्रम बंद पाडला ; सुप्रिया सुळे संतापल्या;पहा video

Bajrang Dal cancels Dandiya program in Pune; Supriya Sule is furious; see video

 

 

 

 

देशभरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गरबा, दांडियासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, अशा कार्यक्रमांना काही संघटना विरोध करत असल्याचं पुढे येत आहे.

 

आता पुण्यातील एक कार्यक्रम बजरंग दलाने बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. याबाबत त्यांनी बजरंग दलाला इशारा दिला आहे.

 

“बारामती येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरू असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही.

 

हे ‘मोरल पोलिसींग’ यापूर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

 

 

तसंच, नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.

 

नवरात्रोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पायी गस्त घालण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

 

नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळण्याच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात आवश्यक तो बंदोबस्त लावण्यात यावा. हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने,

 

सार्वजनिक गर्दीची ठिकाणे या जागी गस्त घालावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *