मावशीच्या बालेकिल्ल्यात भाच्याची इंट्री ,उमेदवारी मिळणार काय ?

Will the niece's entry and candidacy get in the aunt's castle?

 

 

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्येच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे राजकीय पक्ष उमेदवार चाचपणी करण्यात गुंतले आहेत.

 

त्यात सोलापूरच्या राजकारणात नवं ट्विस्ट आलं आहे. शहरात सुशीलकुमार शिंदेचे नातू शिखर पहारिया यांचे दौरे वाढले आहेत. ़तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रणिती शिंदे खासदार झाल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न राज्याला पडला आहे.

 

विधानसभा निवडणुकीअगोदर मावशीच्या मतदारसंघात शिखर यांचे दौरे वाढल्याने काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिखर पहारियाने मागील आठवड्यात अनेक गणेश मंडळाना भेटी दिल्या होत्या.

 

दोन दिवसांअगोदरच शिखर पहारिया हे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अनेक भेटीगाठी करून गेले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात नवे राजकीय वळण मिळण्याच्या चर्चा सुरु आहेत.

 

शिखर पहारिया यांच्या मावशी प्रणिती शिंदे २००९ पासून सोलापूर शहर मध्यच्या आमदार होत्या. खासदार झाल्यानंतर शहर मध्यच्या जागेवर काँग्रेस पक्षातील जुने नेते कार्यकर्ते यांना आमदार होण्याची स्वप्ने पडू लागली होती.

 

मुस्लिम, पद्मशाली आणि मोची बहुल मतदारसंख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रात या समाजाच्या काँग्रेस नेत्यांनी उमेदवारीचा दावा ठोकला होता.

 

परंतु शिखर पहारियाच्या वेळोवेळी झालेल्या एन्ट्रीने काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांची झोप उडाली आहे. मावशीच्या जागेवर

 

शिखर पहारिया नशीब आजमावणार की नाही, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट असले तरी दबक्या आवाजात कुजबुज मात्र सुरू झाली आहे.

 

शिखर पहारिया हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मोठ्या कन्या स्मृती पहारिया यांचे मोठे चिरंजीव आहेत. शिखर पहारिया यांनी मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी बांधकाम व्यवसायात मोठी मजल मारली आहे.

 

बॉलिवूडमधील जानवी कपूर यांच्या सोबत शिखर पहारिया अनेकदा चर्चेत आले होते. शिखर हे मुंबईत वास्तव्यास आहेत, अनंत अंबानीसोबत देखील शिखर पहारिया यांची घनिष्ठ मैत्री आहे.

 

शिखर पहारिया सोलापुरात पहिल्यादा चर्चेत आले ते म्हणजे जानेवारी २०२३च्या श्री सिद्धेश्वर महायात्रेत सार्वजनिक रित्या सहभागी झाले होते.

 

खासदार प्रणिती शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिखर पहारिया संपर्क वाढवत आहेत. नुकताच त्यांनी गारमेंट फॅक्टरीला भेटी देत समस्या जाणून घेतल्या, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमात जाऊन संवाद साधला आहे.

 

मध्य विधानसभा मतदारसंघातील नवरात्रौत्सव मंडळांना भेट देत लेझीमचा आनंद घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेचे नातू शिखर

 

हे सोलापुरात अधिक प्रमाणात वावरू लागल्याने इच्छुक उमेदवार दोन पाऊल मागे सरकले आहेत. शिंदे मावशी आणि शिंदे आजोबा काय निर्णय घेतील, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *