भुजबळ म्हणाले ,आता मला आराम करू द्या’

Bhujbal said, "Let me rest now."

 

 

 

छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय. छगन भुजबळांच्या रिटायरमेंटच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये.

 

आता मला आराम करू द्या म्हणत भुजबळांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. स्वतःच्या रिटायरमेंटचे संकेत देतानाच तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या

 

असं समीर आणि पंकज भुजबळांना त्यांनी सांगितलंय.रिटायरमेंटचा निर्णय घेताना कुणाला विचारण्याची गरज नसल्याचंही भुजबळांनी म्हटलंय.

 

भुजबळांनी खरोखरच निवृत्तीचे संकेत दिलेत की भावनिक आवाहन करून राजकीय खेळी केली, असाही प्रश्न उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीची वाट पाहणाऱ्या

 

भुजबळांच्या पदरी निराशा आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या भुजबळांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटलेत. गेल्या 2 दशकांपासून येवला मतदारसंघावर भुजबळांचं एकहाती वर्चस्व आहे.

 

 

पुतण्या समीरसाठी नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ फिल्डिंग लावत आहेत. पुतण्या समीरला नांदगावमध्ये पाय रोवता यावेत म्हणून नेहमीप्रमाणे

 

भुजबळांनी भावनिक साद घातल्याची चर्चा आहे. भुजबळांनी भावनिक साद घालून पुतण्यासाठी सेफ ग्राऊंड तयार केल्याचंही बोललं जात आहे.

 

छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते. आपल्या आक्रमक भाषणांसाठी भुजबळ ओळखले जातात. मात्र राजकीय वाऱ्याचा

 

अंदाज बांधण्यातही भुजबळांचा हातखंडा आहे. त्यामुळे भावनिक आवाहन करून भुजबळांनी नेमकं काय साधलं, हे येत्या काळात समोर येईलच.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *