Bogus teacher Scam; The Maharashtra government was cheated of thousands of crores of rupees through the teacher recruitment scam!शिक्षक भरती घोटाळ्यातून महाराष्ट्र सरकारला हजारो कोटी रुपयांचा चुना

Bogus teacher recruitment #vyapamscam #teacherrecruitment #parbhaninews #mujeebshaikh

 

 

 

गेल्या काही दिवसापासून Bogus teacher recruitmentबोगस शिक्षक भरती प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हजारो शिक्षकांना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शाळांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचे प्रकार उघड होत आहेत .

 

त्यात संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांची मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे, शिक्षक बोगस भरती प्रकरणी नागपुरातील काही अधिकाऱ्यावर कारवाई झाली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे .

 

मध्यप्रदेशातील Vyapam scams व्यापम घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे ,त्यामुळे या प्रकरणाची सरकारने निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

2011 मध्ये राज्यातील शाळांची विद्यार्थी पडताळणी करण्यात आली होती ,यात शाळांनी दाखविलेले एकूण पटसंख्या आणि उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली होती.

 

त्यामुळे राज्य सरकारने 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी आणून शिक्षक समायोजन सुरू केले ,मात्र 2014 मध्ये पुन्हा इंग्रजी गणित आणि विज्ञान विषयाच्या Teacher Recruitmentशिक्षक भरतीला काही अटी शर्तीवर मंजुरी देण्यात आली

 

,शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी देण्या संदर्भात शिक्षण उपसंचालकांना अधिकार देण्यात आले होते, मात्र अनेक संस्थाचालक व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याकडून या निर्णयाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक भरती झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.

 

या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे बोलले जात आहे ,राज्य सरकारने 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी आणली त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा TETटीईटी सुद्धा सुरू करण्यात आली,

 

2019 ते 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली मात्र अनेक नियुक्त्या 2012 पूर्वीच्या दाखवण्यात आले आहेत ,तसेच एकाच व्यक्तीला दोन ठिकाणी नियुक्ती देण्याचे प्रकारे उघड होत आहेत,

 

अनेक ठिकाणी बोगस प्रमाणपत्र देऊन नियुक्ती देण्याच्या तक्रारी आहेत ,मुख्याध्यापक पदासाठी पात्रता नसताना खोटे कागदपत्र जोडून नियुक्ती करण्यात आली आहेत.

 

या संपूर्ण प्रकारामुळे पात्र विद्यार्थी मात्र नोकरी पासून वंचित राहिले आहेत. राज्यात शिक्षक भरती घोटाळ्यातून राज्य सरकारला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे,

 

गरज नसताना आणि कोणतीही मंजुरी नसताना खोट्या कागदपपत्रांचा आधार घेत ही भरती करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 

इतकेच नाही तर 2011 पासून नियुक्ती दाखवून तेव्हापासूनचा पगार हा राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे राज्यात 2012 नंतर एकूण किती शिक्षकांची भरती झाली ? मंजूर पदे किती ? किती पदे भरण्याचा आदेश देण्यात आला ?

 

आणि नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांची नावे व रुजू होण्याचा दिनांक त्याची सविस्तर माहिती उपलब्ध करून घेतल्यास या प्रकरणातील गुंता सुटण्याची आणि घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येऊ शकेल

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *