मराठा आंदोलक आक्रमकनितेश राणेंच्या पुतळ्याचं दहन

Burning of effigy of Maratha protester Nitesh Rane

 

 

 

भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

 

मराठा आंदोलकांनी सार्वजनिक शौचालयासमोरच आमदार नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध केला. यापुढे जरांगे यांच्यावर टीके केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला.

 

मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद जिना आहेत, त्यांच्या आंदोलनाचा फायदा हा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त झाल्याचं आमदार नितेश राणे म्हणाले होते.

 

त्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी नितेश राणे

 

यांना पाळीव कुत्र्याची उपमा दिली. यावेळी संतप्त आंदोलकांनी नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा चक्क शौचालयाच्या दारातच दहन केला.

 

 

यापुढे मनोज जरांगे यांच्यावर जर कोणी टीकाटिप्पणी केली तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

 

मराठा समाज बांधवांनी रेणापूर फाटा या ठिकाणी हे आंदोलन केलं. नितेश राणे यांच्या प्रतिकत्मक पुतळ्याचे मराठा आंदोलकांनी दहन करत जोरदार घोषणाबाजी केली.

 

मनोज जरांगे आधुनिक महम्मद अली जिना असल्याची टीका नितेश राणेंची केली होती. जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा हा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त झाला,

 

त्यामुळे मनोज जरांगेंच्या दाढीवर शंका यायला लागली असल्याचं ते म्हणाले. तसेच जरांगे हे गोधडीत असताना नारायण राणेंनी मराठ्यांना आरक्षण

 

मिळवून दाखवलं असंही ते म्हणाले होते. मनोज जरांगे हे ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेत नारायण राणे आणि प्रवीण दरेकर हे प्राध्यापक होते असंही ते म्हणाले.

मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा फडणवीसांचा प्लॅन असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. आम्ही तुमचा सन्मान करतो, मात्र फडणवीसांचे ऐकू नका असा सल्ला यावेळी जरांगे यांनी नारायण राणे यांना दिला.

 

 

मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या दाढीवर नाही सर्वांच्याच दाढीवर आक्षेप घेतला असेल. सगळ्या दाढी राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला. दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण आहे. मी त्यांना उत्तर देत नाही.

 

 

मी त्यांचा आदर करतो. त्यांना आदर शब्दाचा अर्थच कळत नाही. ते जे बोलतात ते देवेंद्र फडणवीसची भाषा बोलतात. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. समाजाचा नाईलाज होईल असा इशारा मनोज जरांगेंनी नितेश राणेंना दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *