DD न्यूजने लोगो केला भगवा ;निर्माण झाला वाद
DDNews made logo saffron; controversy arose

सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या प्रसार भारतीने आपली हिंदी वृत्तवाहिनी डीडी न्यूजच्या लोगोचा लाल रंग बदलून तो भगव्या रंगात बदलल्यामुळे अनेकांकडून टीका होत आहे.
सत्ताधारी भाजपाकडून सरकारी माध्यमांचे भगवीकरण सुरू असल्याचा आरोप विरोधक आणि माध्यमात काम करणाऱ्यांनी केला.
१६ एप्रिल रोजी दूरदूर्शनने सोशल मीडियावर या नव्या लोगोची झलक दाखविली. यासोबतच डीडीने एकूणच ब्रँडिग, स्टुडिओ आणि बातम्यांच्या सादरीकरणामध्ये मोठे बदल केले आहेत.
प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. लोगोचा रंग भगवा नसून नारिंगी आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी जी२० शिखर परिषदेच्या आधी आम्ही
डीडी इंडिया या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या लोगोतही अशाच प्रकारे बदल केले होते. आता एकाच समूहाच्या दोन्ही वृत्तवाहिनीच्या लोगो आणि इतर डिझाईनला एकसारखे करण्यात आले आहे, असे गौरव द्विवेदी म्हणाले.
इंग्रजी आणि हिंदीमध्ये मनोरंजन आणि बातम्यांचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या डीडी नॅशनलचाही लोको मागच्या वर्षी केशरी / नारिंगी आणि निळ्या रंगात बदलण्यात आला होता,
असेही द्विवेदी म्हणाले. फक्त लोगोचा रंगच नाही तर आम्ही स्टुडिओ आणि बातम्यांच्या सादरीकरणाच्या ग्राफिक्समध्येही बदल केल्याचे ते म्हणाले.
द्विवेदी पुढे म्हणाले, “मागच्या अनेक दशकात अनेकवेळा लोगोचा रंग बदलण्यात आलेला आहे. अनेर रंगाचे मिश्रण लोगोमध्ये
याआधी करण्यात आले आहे. वृत्तवाहिनीला थोडे वेगळे आणि नव्या स्वरुपात दाखविण्यासाठी सदर बदल करण्यात आले आहेत.”
प्रसार भारतीचे माजी सीईओ (२०१२ ते २०१६) आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार व तृणमूल काँग्रेसचे नेते जवाहर सरकार यांनी
या बदललेल्या लोगोवर टीका करताना म्हटले की, सरकारी माध्यमांचे भगवीकरण करण्याची ही मोहीम असून प्रसार भारतीचे आता प्रचार भारती करण्यात आले आहे.
While our values remain the same, we are now available in a new avatar. Get ready for a news journey like never before.. Experience the all-new DD News!
We have the courage to put:
Accuracy over speed
Facts over claims
Truth over sensationalismBecause if it is on DD News, it… pic.twitter.com/YH230pGBKs
— DD News (@DDNewslive) April 16, 2024