EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न ?
Attempt to enter the strong room where the EVM machine is kept ?

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेले वाद आणि आरोप्रत्यारोप मतदानानंतरही थांबलेले नाहीत. आता इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या बाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
काही उमेदवारांचे प्रतिनिधी सुरक्षारक्षकांप्रमाणे कपडे घालून आले होते. त्याला भाजपच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यावरून दोघांत बाचाबाची झाली.
बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या संघटनेसंबंधी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये
घुसण्याचा प्रयत्न केला केल्याचा आरोप केला. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत कोणीही आत शिरण्याचा प्रयत्न केला नसून स्ट्राँगरुममध्ये ठेवलेली यंत्रे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
यासंबंधी रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या सुमारे २५-३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला,
परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र
सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे.
पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.