Exit Polls : बारामतीत कोणाचा विजय ?काय सांगतो एक्झिट पोल
Exit Polls: Who will win in Baramati? What exit polls say

लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल चार जूनला जाहीर होणार आहेत. मतदानाचा सातवा व शेवटचा टप्पा पार पडताच राजकीय वर्तुळाचे डोळे एक्झिट पोलकडे लागले होते.
टीव्ही९ पोलस्ट्राट-पीपल्स इनसाईट्स आणि एबीपी-सीव्होटर या दोन एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसताना दिसत आहे. देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे.
बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीला अनेक पदर होते. कारण इथे फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार
किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार विरुद्ध बंडखोर पुतण्या अजित पवार असाही सामना होता. किंवा अजितदादांच्या सांगण्यानुसार नरेंद्र मोदी विरुद्ध राहुलं गांधी अशी लढत होती.
एक्झिट पोलनुसार बारामती लोकसभा मतदारसंघात नणंदबाई बाजी मारण्याची चिन्हं आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार
आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपली जागा टिकवण्याची शक्यता आहे. सुळे विजयी झाल्यास हा त्यांचा सलग चौथा विजय असेल.
महत्त्वाचं म्हणजे, सुनेत्रा पवार यांचा पराभव ही अजित पवार यांच्यासाठी मोठी नामुष्की असेल. शरद पवार यांच्याविरोधात बंड करत अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला होता.
त्यानंतर थेट भगिनी सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात पत्नीलाच उतरवत परिवारातली लढाई निर्माण केली. हे पुतण्याने काकांना, भावाने बहिणीला दिलेलं चॅलेंज होतं. मात्र त्यात शरद पवारांना यश आल्यास अजितदादांसाठी मोठा फटका असेल.