आयकर विभागाची थेट शिंदे गटाच्या मंत्र्याला नोटीस
Income Tax Department issues notice directly to Shinde group minister,Shinde group minister gets a huge blow; Sanjay Shirsat gets a direct notice from the Income Tax Department, during a public event...


छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेल प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. शिरसाटांना थेट आयकर विभागाची नोटीस आल्याने हा मोठा धक्काच शिंदे गटाला म्हणावा लागेल.
सरकारचा मोठा निर्णय; आता पत्नीचेही नाव लागणार सातबारावर
स्वत: एका जाहीर कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी कबूली दिली की, त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. आता आयकर विभागाकडून शिरसाटांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाईल.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर आयकर विभागाने ही कारवाई केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिरसाटांची देखील या प्रकरणी त्यांच्या संपत्तीबद्दल चौकशी होण्याची शक्यता आहे.
थेट आमदाराकडूनच कॅन्टीनवर काम करणाऱ्या वेटरला मारहाण
संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, पैसे कमावणे सोपं आहे. मात्र, ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचेही त्यांनी म्हटले. 2019 च्या निवडणुकीत त्यांची संपत्ती किती होती आणि 2024 मध्ये ती किती वाढली.
या संदर्भात त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या व्हिटस् हॉटेलच्या लिलावावरून संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर आरोप करण्यात आले होते.
सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी
व्हिटस् हॉटेल हे छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध हॉटेल असून तिथे सर्व सुविधा आहेत. रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ हे हॉटेल आहे. हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ती केवळ 67 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप होता.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली होती. विरोधकांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात लावून धरला होता. यावर जोरदार चर्चा देखील झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली.
त्यामध्येच आता संजय शिरसाट यांना थेट आयकर विभागाची नोटीस आली. संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप झाली. आता संजय शिरसाट चाैकशीमध्ये काय खुलासे करतात,
चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?
याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सगळ्याचा महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते.