Maharashtra Breaking News;मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडल्याने एकच खळबळ ;नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking News;Drone crashes near Chief Minister Fadnavis, causing a stir; what exactly happened?


संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे.याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे,
हे सुद्धा वाचा !Breaking News: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग
ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली आहे. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला.
सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये. ड्रोन खाली पडल्यानंतर पोलिसांकडून तो जप्त करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा !BREAKING NEWS;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीला
आजपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. याचदरम्यान ही घटना घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. याचदरम्यान हा ड्रोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडला. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये, पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे.
हे सुद्धा वाचा !पाहा दोन दिवस कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस
आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे, या पालखी चित्रिकरण ड्रोनच्या माध्यमातून केलं जातं. पालखीचं चित्रिकरण सुरू असतानाच हा ड्रोन खाली कोसळल्याची घटना घडली आहे,
देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ अवघ्या पाच ते दहा फूट अंतरावर हा ड्रोन खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे.
हे सुद्धा वाचा !Maharashtra Breaking News;मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडल्याने एकच खळबळ ;नेमकं काय घडलं?
दरम्यान दुसरीकडे अलंकापुरीमध्ये देखील वारकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत,
विठूरायाच्या दर्शनाची आस या वारकऱ्यांना लागली आहे. देहू आणि आळंदीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठलाच्या नामाचा जयघोष सुरू आहे. वारकीर मोठ्या उत्साहान वारीमध्ये सहभागी झाले आहेत.