आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य
More than 5 lakh 78 thousand students out of school due to Aadhaar card being invalidated

राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी दिलेल्या युडायस प्लस पोर्टलवर आधार कार्ड वैध असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संचमान्यता करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे तब्बल ५,७८,४३३ विद्यार्थी निराधार होण्याचा धोका आहे.
मनोज जरांगे फडणवीसांवर जॅम खुश ,म्हणाले फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसला
राज्यभरातून या विद्यार्थ्यांची आधार कार्डे अवैध ठरल्याने आता हे विद्यार्थी शालाबाह्य ठरणार आहेत. युडायस पोर्टलवरून अद्याप ७० हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची वैधता तपासण्याचे काम झाले नसल्याने या संख्येत भर पडणार आहे.
यंदापासून शाळांना सरल पोर्टल आणि युडायस पोर्टल या दोन वेगवेगळ्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे सक्तीचे नाही. त्याऐवजी युडायस प्लस याच पोर्टलवर ही माहिती भरता येणार असून पटावर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांच्या आधार काडाँची वैधता तपासूनच संचमान्यता करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरची मोठी दुर्घटना थोडक्यात टळली;पाहा VIDEO
ज्या विद्याथ्यांची आधार कार्डे वैध ठरणार नाहीत, ते विद्यार्थी शालाबाह्य केले जाणार आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील २ कोटी १४ लाख ६८ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी २ कोटी ०९ लाख ६९ हजार ५२९ विद्यार्थ्यांनीच आधार कार्डे दिली होती.
आधार कार्ड पुरवलेल्या २,०९,६९,५२९ विद्यार्थ्यांपैकी युडायस पोर्टलवर केलेल्या तपासणीत आणि नोंदणीत २ कोटी ०३ लाख २१ हजार ४०८ विद्यार्थ्यांची आधार कार्डे वैध असल्याचे समोर आले आहे. तर ५,७८,४३३ विद्यार्थ्यांची आधार कार्डे अवैध ठरली आहेत. अद्याप ६९,६८८ विद्यार्थ्यांची आधार कार्डे तपासली नसून ही प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला
या आकडेवारीनुसार आधार कार्ड नसलेले ४,९८, ७५९ विद्यार्थी आधीच शाळाबाह्य ठरले आहेत. त्यात आता आधार कार्ड अवैध ठरलेल्या ५,७८,४३ १,४३३ विद्यार्थ्यांची भर पडल्याने राज्यातील सुमारे १०,७७,००० विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार आहेत.
हे विद्यार्थी शाळेत येत असूनही त्यांची नोंद पटसंख्येवर होणार नाही. परिणामी पटसंख्या कमी भरणार आहे. हे विद्यार्थ्यांचे नुकसान असून हा प्रकार शिक्षणहक्क कायद्याशी हटकून असल्याची टीका आता शिक्षक संघटना करत आहेत. या नियमामुळे ग्रामीण आणि शहरी भागांमधीलही अनेक शाळांचे अस्तित्त्व संकटात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाने पुण्यात मोठा भूकंप येणार?
आधार वैध्यतेची सक्ती शिक्षणहक्क कायद्याच्या विरोधात आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात बसून शिकत असताना त्याला फक्त तांत्रिक कारणावरून अमान्य करणे अन्यायकारक आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होण्याचा आणि शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे









