आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही
Now, you don't need Truecaller to identify unknown numbers.

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार थेट 3 हजार रुपये
सरकारी टेलीकॉम ऑपरेटरने CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रजेंटेशनची चाचणी सुरु केली आहे. रिपोर्टनुसार, काही टेलिकॉम सर्कलमध्ये या नवीन फीचरची प्रायोरिटी बेसिसवर चाचणी केली जात आहे.
खाजगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्हीआयने अनेक टेलीकॉम सर्कलमध्ये यापूर्वीच CNAP सर्विस रोलआऊट केली आहे.
मुंबईतील इंजिनिअरचा इराकमध्ये भयानक मृत्यू
या फीचरअंतर्गत यूजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर समोरील व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसते. यासाठी ट्रूकॉलरची देखील गरज नसते.
दूरसंचार नियामक TRAI ने टेलीकॉम ऑपरेटर्सना CNAP सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फ्रॉड आणि स्कॅम कॉलची ओळख पटवण्यासाठी ही सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहात अटक
यामुळे जर यूजर्सकडे ट्रूकॉलर नसेल तरी देखील त्यांना समजू शकेल की त्यांना कोण कॉल करत आहे. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार, एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडियाने ही सेवा वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडने सध्या खाजगी टेलीकॉम ऑपरेटर्ससह मिळून CNAP सर्विसची चाचणी सुरु केली आहे. या क्षेत्रातील एका एग्जीक्यूटिवने असा दावा केला आहे की, बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात या सर्विसची चाचणी सुरु केली आहे.
अवकाळीचे सावट, महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये संपूर्ण भारतात ही सर्विस रोलआऊट केली जाईल. हे सोल्यूशन बीएसएनएलसाठी सीएनएपीकरिता सी-डॉटने विकसित केले आहे.
CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन सर्विसमध्ये फोनवर येणाऱ्या इनकमिंग कॉलमध्ये कॉलरचे नाव दर्शवले जाते. सिम खरेदी करताना कॉलरने जे नाव कस्टमर एक्वीजिशन फॉर्ममध्ये लिहीले आहे
तेच नाव यूजरच्या स्क्रीनवर दर्शवले जाते. या सर्विसच्या मदतीने कोणत्याही अनोळखी कॉलरचे नाव यूजरच्या स्क्रीनवर दिसते.
युद्धाचा परिणाम : अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण
यामुळे स्कॅम आणि फ्रॉड कॉल्सपासून यूजर्सचे संरक्षण होऊ शकते. यापूर्वी टेलीकॉम ऑपरेटर्सने CNAP सर्विस सुरु करण्यास विरोध दर्शवला होता
आणि सांगितलं होतं की, या सर्विसमुळे यूजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ट्रायच्या शिफारशीनुसार ही सेवा नंतर सुरू केली जात आहे.
RSS वर बंदी घाला, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने अलीकडेच Vo WiFi सर्विस सुरु केली आहे. यामध्ये यूजर्सना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
Vo WiFi म्हणजेच वॉइस ओवर वाय-फाय. या सर्विस अंतर्गत यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट म्हणजेच वायफाय कनेक्टिविटी असेल तरी देखील यूजर्स कॉल करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत, कमी नेटवर्क असलेल्या भागातही यूजर्सच्या फोनवर येणारे महत्त्वाचे कॉल चुकणार नाहीत.
धनगर समाजाकडून सुनेत्रा पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न








