Sharad Pawar-Ajit Pawar ;शरद पवार-अजित पवार एकत्रच ;मोठ्या नेत्याचा दावा
Sharad Pawar-Ajit Pawar together; claims big leader

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.
त्यानंतर एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा जोर धरत आहे. यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची गरज काय ?
ते आधीपासून एकत्र असल्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहे असं वक्तव्य Strikeप्रहारचे प्रमुख Bachu Kaduबच्चू कडू यांनी केलं. जशी चाणक्य नीती आहे तशी पवार नीती असल्याचे कडू म्हणाले.
कोकणात व मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी मतदान यादीत नाव असलेल्या Marathi votersमराठी मतदारांनी मुंबईत मतदान करु नये यासाठी भाजप नवीन परिपत्रक आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
दोन ठिकाणी मतदान केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या तयारीही राज्य सरकारने दर्शवली आहे. मतदार कार्ड Aadhaar linkआधारशी लिंक हा यातलाच एक भाग असल्याचा बच्चू कडू यांनी केला आहे. औरंगजेबासारखे भाजप मराठी माणसावर चालून येत असल्याचे कडू म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन बच्चू कडू यांनी आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरचे काही मीटर अंतरावर असलेल्या ट्राफिक पार्क रक्तदान आंदोलन केले.
राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही Blood Movementरक्तदान आंदोलन करत असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. आता कर्जमाफी केली तर मतदार विसरुन जाईल म्हणून राज्य सरकार कर्जमाफीसाठी येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची त्यांना आठवण करुन देण्यासाठी आजचे आंदोलन होते. 2 जूनला Ajit Pawarअजित पवार यांच्या बारामती येथील घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असेही Sharad Pawarशरद पवारांनी सूचवले होते. त्यानंतर, दोन्ही Nationalist Congressराष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या चर्चेत आहे.
विशेष म्हणजे खासदार Supriya Suleसुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, आधी देश महत्त्वाचा आहे, सध्या देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहाता यास प्राधान्य आहे, त्यानंतर एकत्रिकरणाचं पाहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे,
या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात. पण पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाहीत. आताही सारखी चर्चा चालली आहे.
अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे हे सर्व जण असे लांब उभे असतात. काय तुम्ही निर्णय घेणार ते सांगा. हे तीन जण मिळून पक्ष होता.
रोहित पवार वगैरे हे देखील सर्वजण लांबच आहेत. या तीन जणांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते, पण गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाहीये,’
असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येतायेत म्हणून दोन्ही पवारांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे का? असा प्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं, माहीत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर
यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही पवार एकत्रीत येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.