M P Vijay Shah; registered against Madhya Pradesh minister for making statement against Colonel Sophia Qureshiकोर्ट संतापले ;कर्नल सोफिया कुरेशी विरोधात वक्तव्य करणाऱ्या मध्यप्रदेशातील मंत्र्यावर गुन्हा दाखल

Court gets angry; file a case against Madhya Pradesh minister who made a statement against Colonel Sophia Qureshi within four hours

 

 

 

#Sophia Qureshi कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त करणारे भाजप मंत्री #vijay shahविजय शाह अडचणीत सापडले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं विजय शाह यांच्या वक्तव्याबाबत कठोरभूमिकाघेतली आहे.

 

विजय शाह यांच्यावर पुढील चार तासात एफआयआर करण्यात यावी असे निर्देश मध्यप्रदेशच्या डीजीपींना दिले आहेत. हायकोर्टानं या वक्तव्याबाबत स्वत:दखल घेत म्हटलं की या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

 

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठानं विजय शाह यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आता उद्या सकाळी पुन्हा या प्रकरणी सुनावणी होईल.

 

भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.”त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला.

 

त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल”, असं विजय शाह म्हणाले होते.

 

विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं काँग्रेस आक्रमक
भाजप मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचं शिष्टमंडळ श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल होतं.

 

काँग्रेसनं विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. मध्य प्रदेश काँग्रेस उद्या या प्रकरणी राज्यभरात पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देणार आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, भाजपच्या विजय शाह यांनी सैन्याचा अपमान केला आहे. त्यांना एक मिनिट देखील मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार नाही.

 

विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं देशातील लोकांमध्ये नाराजी आहे. श्यामला हिल्स पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातील निवेदन दिलं आहे. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिलं आहे.

 

विजय शाह यांचा माफीनामा
सोफिय कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री विजय शाह यांनी माफी मागितली आहे. मी दहावेळा माफी मागण्यास तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असं विजय शाह म्हणाले.

 

माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाले, असंही विजय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

कोण आहे विजय शहा

हरसुद विधानसभा मतदारसंघ कुंवर विजय शाह यांच्याकडे आहे. ते सातव्यांदा आमदार आहेत. स्वातंत्र्यानंतर १९५७ मध्ये हे ठिकाण अस्तित्वात आले. गेल्या ३३ वर्षांपासून भाजप या जागेवर कब्जा करत आहे.

 

विजय शहा १९९० पासून येथून सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. आजपर्यंत काँग्रेसला त्यांचा अजिंक्य किल्ला भेदता आलेला नाही. विजय शहा यांच्यासमोर काँग्रेसच्या सर्व रणनीती अपयशी ठरतात.

 

ही जागा १९७७ पासून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. विजय शहा हे आदिवासी समुदायातून येतात. विजय शहा हे प्रत्येक भाजप सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सध्या ते राज्याचे वनमंत्री आहेत. खांडवामध्ये त्यांची गणना एक मोठा आदिवासी चेहरा म्हणून केली जाते.

 

 

खरंतर, विजय शहा यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६२ रोजी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. पत्नीचे नाव भावना शाह आहे. राजकारणासोबतच विजय शहा व्यवसायही करतात. त्यांची गोदामे आहेत. याशिवाय त्यांची एक गॅस एजन्सी देखील आहे.

 

त्यांनी विद्यार्थीदशेतच राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी ख्रिश्चन कॉलेज विद्यार्थी संघटनेत विविध पदांवर काम केले आहे. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाले.

 

१९९० मध्ये त्यांना पहिल्यांदा भाजपकडून तिकीट मिळाले. यात तो जिंकला होता. २०१८ मध्ये ते सातव्यांदा आमदार झाले. २०२० मध्ये शिवराज सरकार सत्तेत आले तेव्हा ते पुन्हा मंत्री झाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *