SSC Parbhani News;इयत्ता दहावी परीक्षेत मारिया मुस्ताबशीरा हिचे घवघवीत यश
Parbhani News; Maria Mustabashira's impressive success in the class 10th exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.
यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.
परभणी येथील मोईदूल मुस्लिमीन उर्दू शाळेतील मारिया मुस्तबशीरा इलाही खान या विद्यार्थिनीने इयत्ता दहावी परीक्षेत तब्बल 92.80% गुण घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे,
तिच्या या यशाबद्दल आई वडील,नातेवाईक,शिक्षक वृन्दाकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे,भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजात आरोग्यसेवा करण्याचा मनोदय मारिया मुस्तबशीरा इलाही खान हिने व्यक्त केला आहे. मारिया मुस्तबशीरा इलाही खान ही लोहगाव येथील जमीनदार इलाही खान पठाण यांची कन्या आहे
यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे.
तर २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती.
त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. यातील ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला आहे,
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थी बसले.
१४ लाख ८७ हजार ३९९ विद्यार्थी पास झाले आहे. त्यांची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे, असेही शरद गोसावींनी सांगितले.
इयत्ता दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विभागाचा निकाल तब्बल ९८.२८ टक्के इतका नोंदवला आहे. तर, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.७८ टक्के इतका लागला आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागला आहे. या जिल्ह्याचा निकाल ९९.३२ टक्के इतका आहे. याउलट, गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ८३.६७ टक्के नोंदवला गेला आहे.
ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तपास करून हा निर्णय घेतला जाणार आहे. कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिसांनी मदत केली. प्रत्येक पेपरसाठी नियमित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली होती. परीक्षेत गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सांगितलं होतं. कोणती शिक्षा होऊ शकते याची कल्पना असावी म्हणून सांगण्यात आलं होतं,