ठाकरे दिल्लीत करताहेत शिंदेसेनेला अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी
Thackeray is doing things in Delhi that are disturbing the Shinde Sena.


महायुती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ असताना दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी महायुतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती दोन्ही नेत्यांना केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे भाजपच्या मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत.
हैद्राबाद एअरपोर्टवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
उद्धव ठाकरे काल सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे कुटुंबीय उपस्थित होते.
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होत असताना आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी कालच जहाजबांधणी विभागाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. राज्यापाठोपाठ आता दिल्लीतही हेच चित्र दिसू लागलं आहे.
निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनी पुण्यातील या मतदारसंघात फेरमतमोजणी
दिल्ली दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भूपेंद्र यादव यांचीदेखील भेट घेणार आहेत. भूपेंद्र यादव पर्यावरण मंत्री आहेत. पर्यावरण आदित्य ठाकरेंचा आवडता विषय आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पर्यावरण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या वरळी मतदारसंघात पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि भूपेंद्र यादव यांची भेट महत्त्वाची असेल.
संजय राऊतांचा दावा, चार मंत्री घरी जाणार, भुजबळ म्हणाले ….
भूपेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्द पाहता आदित्य ठाकरेंची त्यांच्याशी होणारी भेट शिंदेसेनेची धडधड वाढवणारी आहे. भूपेंद्र यादव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अतिशय जवळचे मानले जातात.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी यादव यांचं नाव स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे भूपेंद्र यादव हे ठाकरे आणि पवार कुटुंबियांच्या जवळचे आहेत. दोन्ही कुटुंबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
एकनाथ खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ अटकेनंतर काय म्हणाले खडसें
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यादव यांना राष्ट्रीय राजकारणात आलं. २०१९ मध्ये राज्याच्या राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्यावेळी भाजपनं यादव यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून केलेली होती.








