अजित दादांच्या निर्णयाने विद्यमान आमदारांचे टेन्शन झाले कमी

Ajit Dada's decision reduced the tension of the existing MLAs

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये 70 पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

तसेच विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे.

 

 

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

 

 

विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली. 2019 साली राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले होते. त्यात आणखी 15 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे.

 

या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील 80 जागांवर दावा करण्याची तयारी होती. मात्र आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्यांची रननीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता 70 पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे.

 

 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते आणि आमदारांना बोलवण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

 

अमित शाह यांनी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्यानंतर अजित पवार आपल्या आमदारांना आपल्याला घटक पक्षांसोबत जुळवून घ्यायचं आहे

 

या संदर्भात सूचना केलया. तसेच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस जिथे संघर्ष आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं केलं पाहिजे याबाबत सूचना देण्यात आल्या.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महामंडळ वाटपावरून नाराजी आहे. अनेक पदाधिकारी नाराज आहेत त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

नियोजन विभागाच्या माध्यमातून कामांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या मात्र अद्याप जुलै महिन्यापासून आमदारांना निधी देण्यात आलेला नाही. याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

विधानसभेच्या जागावाटपावर महायुतीमध्ये येत्या 24 आणि 25 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ज्या जागा वादातील आहेत

 

त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यावर जर तोडगा निघाला नाही तर नंतर अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *