अजितदादांचे मंत्री म्हणाले माझ्या मुलीला,जावयाला नदीत बुडवा

Ajitdad's minister said drown my daughter, son-in-law in the river

 

 

 

अजितदादा गटाचे नेते, राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या घरातच आता बंड झालं आहे. त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम आणि जावई ऋतूराज हलगेकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

 

त्यामुळे धर्मरावबाबा चांगलेच संतापले आहेत. आपल्याच विरोधात आपली मुलगी विधानसभेला उभी राहणार असल्याने धर्मरावबाबा यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

 

त्यांनी काल तर जाहीर भाषणात आपल्या मुली आणि जावयाला प्राणहिता नदीत बुडवा असं आवाहनच अहेरीच्या मतदारांना केलं आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे होते. यावेळी एका सार्वजनिक कार्यक्रमात अजितदादा यांच्यासमोरच धर्मरावबाबा अत्राम यांनी मुलीच्या बंडावर संताप व्यक्त केला.

 

आपला जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेली तरी चालेल.

 

मला दुसरी एक मुलगी आहे. मुलगाही आहे. माझा एक सख्खा भाऊ विरोधात गेला होता, तो आता सोबत आला आहे. चुलत भावाचा मुलगा माझ्या जोडीला आहे.

 

एक मुलगी गेली तरी माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. पूर्ण अत्राम घराणं या हलगेकर लोकांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धर्मरावबाबा अत्राम यांनी दिला.

 

वारा येत राहतो. लोक पक्षातून सोडून जातात. त्याकडे लक्ष देऊ नका. आमच्या घरचे लोकं मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. जुने प्रदेशाध्यक्ष आपल्या पक्षात येणार आहेत.

 

ज्या लोकांनी 40 वर्ष पक्ष फोडण्याचं काम केलं, घर फोडण्याचं काम केलं ते लोकं आता आणखी एक घर फोडीचा कार्यक्रम करणार आहेत.

 

घरफोडी करून माझ्या माझ्या स्वत:च्या मुलीला माझ्याविरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाकडून सुरू आहे. त्यांच्यावर कदापी विश्वास ठेवू नका.

 

माझ्या जावयावर आणि मुलीवरही विश्वास ठेवू नका. या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे. ज्या लोकांनी धोका दिला आहे,

 

त्या लोकांना प्राणहिता नदीत सर्वांनी फेकून दिलं पाहिजे. गोदावरीतून वाहून हे लोक समुद्रात निघाले पाहिजे, असं धर्मरावबाबा म्हणाले.

 

 

हे काय चाललंय आहे? पक्ष फोडीचा कार्यक्रम झाला, आता तुम्ही घर फोडणार आहात काय? माझ्या मुलीला बाजूला घेऊन घर फोडीचं काम करणार आहात काय?,

 

असा सवाल करतानाच जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती मुलगी तुमची कशी होईल? याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. काय लोकांना न्याय देणार आहे? तुमचं काय काम करणार आहे? याचा विचार करावा लागेल, असंही ते म्हणाले.

 

माझ्या नावाचा वापर करून कोणी आलं तर त्यांना दारातून बाहेर काढा. गावातून बाहेर काढा. एक खुर्ची आहे. या खुर्चीवर कुणी बसण्याचा प्रयत्न केला तर मी माझी तलवार म्यानातून काढली आहे.

 

माझ्या तलवारीला दोन्ही बाजूला धार आहे, सिंगल धारवाली ही तलवार नाही. दोन्ही बाजूने धार आहे. मी राजकारणात हा माझा बाप, भाऊ, बहीण, मुलगी हे पाहत नाही.

 

याचा विचार करणार नाही. जे खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम करणार आहे, असा इशारा देताच मी तुमचं काम इमाने इतबारे केलं.

 

50 वर्ष काम केलं. या भूमीला मी न्याय देत आहे. मध्येच कोणी येऊन वाट लावत असेल तर त्यांना बाजूला केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *