अनिल देशमुखांचा भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

Anil Deshmukh's serious accusations against the big leader of BJP ​

 

 

 

 

 

तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते.

 

 

 

 

या प्रकरणात आता अनिल देशमुखांनी बडा खुलासा केला आहे. माझ्यावर झालेले 100 कोटींचे आरोप हे एका पक्षाने करायला लावल्याचा दावा माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

 

 

 

सरकारने चांदीवाल अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे, तर भाजपच्या एका बड्या नेत्याने मला प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले असल्याचा दावाही देशमुख यांना केला आहे. देशमुख यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह

 

 

 

 

आणि पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते.

 

 

 

 

दरम्यान, या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात माझ्यावरील करण्यात आलेले ते आरोप एका पक्षाने करायला लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

 

 

तर प्रकरणात माझी चौकशी करण्यासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यानंतर माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाचा अहवाल हा दीड वर्षापूर्वीच आला होता.

 

 

 

मात्र, सरकारने तो विधानसभेच्या पटलावर ठेवला नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. मी याबाबत राज्यपाल यांनाही पत्र लिहिलं आहे.

 

 

 

मात्र, त्यांनीदेखील यात लक्ष घातले नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. अधिवेशन संपलेलं असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

 

 

 

 

दरम्यान, चांदीवाल अहवाल सादर केला जाऊ नये, म्हणून यामागे विदर्भातील मोठे नेते असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

 

 

 

वेळ आल्यानंतर मी त्यांचे नावसुद्धा सांगेल, असेही देशमुख म्हणाले. माझा पक्ष माझ्यासोबत आहे. जर मी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र दिले असते,

 

 

 

 

तर माझ्यावरील कारवाई टळली असती, त्यातील 4 ते 5 मुद्दे असे होते की, त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असते, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

 

 

 

राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याने मला प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटलं होतं की, तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या, ईडी, सीबीआयची चौकशी होणार नाही.

 

 

 

 

मला माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरसुद्धा त्यांनी आरोप करण्यास सांगितले होते. मी जर ते ऐकलं असतं आणि केलं असतं तर सरकार कोसळलं असतं. मी याबाबत माहिती योग्यवेळ आली की

 

 

 

, सादर करेल, असंही देशमुख म्हणाले. पेन ड्राइव्हसुद्धा दाखवणार असल्याचे देशमुख म्हणाले. तर सरकारने चांदीवाल अहवाल हा जनतेसमोर आणला नाही तर आपण कोर्टात जाणार असल्याचे देशमुख यांनी इशारा दिला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *