अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची;काय घडले कारण?

In Amravati, the children are bitter and there was a fight between the police; what happened because of this?

 

 

 

 

अमरावती लोकसभा मतदारसंघातून कट्टर विरोध खासदार नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब आमने-सामने आहेत. दरम्यान सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये आज बाचाबाची झाली आहे.

 

 

 

प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचार सभेसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमधील सायन्स कोर मैदान 24 तारखेसाठी बुक केले होते. त्यासाठी त्यांनी संबंधित शुल्कही भरले होते.

 

 

 

दरम्यान आज मैदानाची पाहाणी करण्यासाठी जात असताना आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे घटनास्थळी मोठी गोंधळ निर्माण झाला. तसेच आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

 

 

 

यावेळी बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, 22 आणि 23 एप्रिलसाठी अमरावतीतील सायन्स कोर मैदान बुक केले आहे. त्यामुळे दोन दिवसांसाठी मैदानावर इतर कोणाचाही कार्यक्रम किंवा सभा होऊ नये अशी कडू यांची मागणी आहे.

 

 

 

दरम्यान, आता याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपने सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

 

 

 

त्यामुळे आपल्याला सभेची परवाणगी मिळालेली असताना मैदानावर भाजपचा हस्तक्षेप कसा? हे पाहाण्यासाठी गेल्यानंतर आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

 

 

 

 

 

उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर त्यावेळी मंत्री असलेले मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत कडू महायुतीमध्ये सहभागी झाले होते.

 

 

 

तर दुसरीकडे कडू यांचे कट्टर विरोधक असलेले आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपशी जवळीक साधत भाजपचे तिकिट मिळवले आहे.

 

 

 

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीमध्ये असूनही

 

 

 

 

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने बच्चू कडू यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कट्टर विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बाब ठरत आहे.

 

 

दरम्यान अमरावती येथील अमित शाह यांच्या सभास्थळावरील मंडपाचा काही भाग कोसळला आहे. भाजपच्या सभा मंडपाचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे.

 

 

 

उद्या अमित शाह यांची अमरावती येथे सभा होत आहे. या सभास्थळाच्या परवानगीवरून एकीकडे बच्चू कडू आक्रमक झाले असताना दुसरीकडे या अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला आहे.

 

 

 

 

अमरावतीतील सायन्सकोर मैदानावर अमित शाह यांच्या सभेची तयारी सुरु आहे. दरम्यान, मुख्य मंडपाच्या बाजूचा मांडव वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे.

 

 

 

या मैदानाबाहेर बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते ठिय्या मांडून आहेत. मैदानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनूी या मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली

 

 

 

 

असताना ऐन वेळी बच्चू कडू यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून ते ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.

 

 

 

हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालीसा पण चुकीची होती, राजकीय होती, तुमची ही जबरदस्ती सुरु आहे, त्यावर हनुमानजीही बोलत आहेत,

 

 

 

हे नाही चालणार. देव आमच्यासोबत आहे. इथे कायदा काही राहिलेला नाही. पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल असं पोलीस सांगत असल्याचं बच्च कडू यांनी म्हणलं आहे.

 

 

 

 

अमित शाह अमरावतीत येत असताना, त्यांनाही माहित नसेल की, रवी राणा भाजपला बदनाम करत आहे. भाजपसारखा शिस्तबद्ध पक्ष रवी राणा यांच्या ताब्यात गेल्यामुळे संस्कार, कायदा मोडून हे, सर्व चालू आहे.

 

 

 

आम्ही पैसे भरले परवानगी घेतली. 23-24 साठी मैदाना आमच्या ताब्यात आहे, 18 तारखेला आम्ही पैसे भरले आणि आमच्याच घरातून हाकलण्यासाठी आता पोलीस प्रशासन काम करत आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *