अमित शहांच्या नावाने व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा;महाराष्ट्रातील घटना

1 crore to a businessman in the name of Amit Shah; incident in Maharashtra ​

 

 

 

 

 

सायबर क्राइमच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशात नागपुरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

 

 

 

चोरट्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. अमित शहांचे नाव घेत एका व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.

 

 

 

 

सीएसआर फंडाच्या नावाखाली मुंबईतील काही आरोपींनी मिळून फिर्यादी मोगुलशाद बहना यांना गंडा घातला आहे. टाटा कंपनीतून 460 कोटी रुपये सीएसआर मिळत असून 400 कोटी त्यांना कॅश परत करायचे आहे,

 

 

 

असं चोरट्यांनी व्यापाऱ्यास सांगितले. यामध्ये त्यांना मदत केल्यास उर्वरित 60 कोटी रुपये पैकी 30 कोटी रुपये देण्याचे आरोपींनी बहना यांना आश्वासन दिले होते.

 

 

 

पैसे उकळण्यासाठी या टोळक्याने मोठा प्लान रचला. सुरुवातीपासून त्यानी फिर्यादी व्यक्तीस वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि विविध व्यक्तींशी भेट करून दिली.

 

 

 

 

असे करून तब्बल १ कोटी रुपये आरोपींनी उकळले. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत मुंबईतील आरोपी ॲलेक्स मिरांडा आणि त्याची पत्नी एंजल मिरांडा यांच्या विरोधात जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. मुंबई विमानतळावर चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन एका तरुणाचे लाखो रुपये लुटले होते.

 

 

 

आरोपीला अटक करण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलिसांनी आरोपीस अटक केलीये. विराज सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून

 

 

त्याने पर्फेक्ट कनेक्ट सोल्युशन या प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे पुढील तपासाच उघड झाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *