अमेरिकेत एअर स्ट्राईकची सीक्रेट रिपोर्ट लीक; ट्रम्प तोंडावर पडले
Secret report of air strike in America leaked; Trump falls on his face


इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रांवर अमेरिकेच्या हवाई दलानं दोनच दिवसांपूर्वी हवाई हल्ला केला. यासाठी बी-२ बॉम्बर विमानांचा वापर करण्यात आला. या विमानांनी इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकले.
जमिनीखालील बांधकाम उद्ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बचा वापर होतो. पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणचं फारसं नुकसान न झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
इस्रायल-इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात काय काय महागणार ?
विशेष म्हणजे ही माहिती अमेरिकेच्या गोपनीय अहवालातूनच समोर आलेली आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडले आहेत.
राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापला;सरकार अडचणीत,कवींकडून पुरस्कार वापसी
अमेरिकेनं इराणवरील अण्वस्त्र केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बचा मारा केला. पण यातून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मोठा धक्का बसलेला नाही. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम केवळ काही महिने मागे गेलेला नाही.
अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून ही माहिती उघड झालेली आहे. या हल्ल्याची कल्पना असलेल्या सात जणांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे.
राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येणारे दावे खोटे असल्याचं या मोहिमेची कल्पना असलेल्या ७ जणांनी म्हटलेलं आहे.
इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका खाद्यतेलाला; महागाईची फोडणी
जसजशी अधिक गोपनीय माहिती उपलब्ध होईल, तसतसा यामध्ये बदल होऊ शकतो, असा दावा गोपनीय अहवालातून करण्यात आलेला आहे.
अमेरिकेनं राबवलेल्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरमुळे इराणची अण्वस्त्र केंद्र पूर्णत: नष्ट झाल्याचा दावा ट्रम्प सातत्यानं करत आहेत. पण अमेरिकेच्याच गोपनीय यंत्रणांचा अहवाल त्यांना तोंडावर पाडणारा आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई ;शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खळबळ
इराणमधील संवर्धित युरेनियमचा साठा नष्ट झालेला नसल्याची माहिती ऑपरेशनची कल्पना असलेल्या दोघांनी दिली. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच शुद्धीकरण करण्यात आलेलं युरेनियम अन्यत्र हलवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या हल्ल्यानं अमेरिकेनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम केवळ काही महिने मागे ढकलला आहे. इराणचं फार नुकसान झालेलं नाही.
सितारे जमीन पर चित्रपटातून बौद्धिक अक्षम विद्यार्थांना प्रोत्साहित केले
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा केलेला आहे. आम्ही इतिहासातील सगळ्यात यशस्वी एअर स्ट्राईक केलेला आहे. इराणची अण्वस्त्र केंद्रपूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत,
असं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशांच्या कारवायांमुळे शस्त्रसंधी संपुष्टात येऊ शकते, असं ट्रम्प म्हणाले आहेत.